शहर बसची सेवाही ग्रामीणपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:31 AM2017-10-21T01:31:43+5:302017-10-21T01:31:54+5:30

संपादरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाच्या शहर वाहतुकीतील आपली बसची सेवाही घेण्यात आली आहे.

City bus services to the village | शहर बसची सेवाही ग्रामीणपर्यंत

शहर बसची सेवाही ग्रामीणपर्यंत

Next
ठळक मुद्देआमदार पारवे यांनी केला प्रवास


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपादरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाच्या शहर वाहतुकीतील आपली बसची सेवाही घेण्यात आली आहे. उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर महपौर नंदा जिचकार यांची भेट घेऊन संपादरम्यान आपल्या मतदार संघापर्यंत शहर बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली. उमरेड भिवापूरपर्यंत शहर बस सेवा सुरू करण्यात आली. आमदार सुधीर पारवे यांनी स्वत: या बसने प्रवास केला.
मनपा परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर बस ही सावनेर, काटोल, कोंढाळी रामटेक, मौदा, उमरेड, भिवापूर, जलालखेडापर्यंत सेवा देत आहे इतकेच नव्हे तर भंडारा व वर्धापर्यंत सेवा देत आहेत. ग्रामीण भागापर्यंत एकूण १३६ बसफेºया वाढवण्यात आलेल्या आहेत. शहर बससेवा खालीलप्रमाणे सेवा देत आहे.

असे आहेत थांबे
उमरेड रोड, भंडारा रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, बैद्यनाथ चौक, आग्याराम देवी चौक, सक्करदरा चौक, जगनाडे चौक, गोमती हॉटेल चौक, दिघोरी चौक, हरीहर मंदिर चौक. अमरावती रोड, काटोल रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, मोरभवन, म्हाडा कॉलनी, रविनगर, भरतनगर, बोले पेट्रोल पंप, काटोल नाका, कोराडी, वाडी नाका. सावनेर रोड, कामठी रोड जिल्हाधिकारी कार्यालय, एलआयसी चौक, इंदोरा चौक, आॅटोमोटिव्ह चौक. वर्धा रोड, हिंगणा रोड - रहाटे कॉलनी, छत्रपती चौक, चिंचभवन, खापरी, हिंगणा टी पार्इंट.

Web Title: City bus services to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.