शहर पोलिसांचा ‘आवाज’ बंद

By Admin | Published: February 15, 2016 02:58 AM2016-02-15T02:58:02+5:302016-02-15T02:58:02+5:30

शहर पोलीस दलाचा ‘आवाज’ म्हणून ओळख असलेले पोलीस माहिती केंद्र गेल्या २४ तासांपासून बंद पडल्यासारखे आहे.

The city 'voice' of the police stopped | शहर पोलिसांचा ‘आवाज’ बंद

शहर पोलिसांचा ‘आवाज’ बंद

googlenewsNext

दूरध्वनी सेवा कोलमडली : सुधारणा कधी होणार ?
नागपूर : शहर पोलीस दलाचा ‘आवाज’ म्हणून ओळख असलेले पोलीस माहिती केंद्र गेल्या २४ तासांपासून बंद पडल्यासारखे आहे. दूरध्वनी सेवा कोलमडल्याने माहिती केंद्रातील पोलिसांची अक्षरश: त्रेधातिरपट होत आहे.
हायटेक पुलिसिंगकडे वाटचाल करणाऱ्या नागपूर पोलिसांचा आवाज म्हणून माहिती केंद्राचा उल्लेख होतो. शहरातील सर्व पोलीस ठाणी, विविध विभाग आणि अधिकारी तसेच पत्रकारांशी माहिती केंद्र सातत्याने संपर्कात असते. कुठे काय घडले, ते ऐकण्या-सांगण्याचे अधिकृत स्थान म्हणूनही माहिती केंद्राचा उल्लेख होतो. मात्र, येथील दूरध्वनी सेवा शनिवारपासून विस्कळीत झाली आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतर शनिवारी रात्री ती सुरळीत झाली, मात्र काही वेळेसाठीच! नंतर पुन्हा ती नादुरुस्त झाली. त्याला २४ तासांपेक्षा जास्त अवधी झाला तरी दूरध्वनी यंत्रणा दुरुस्त झाली नसल्याने शहरात नेमके काय घडले, त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे हक्काचे केंद्रच अबोल झाले आहे.
येथील कर्मचारी आपल्या भ्रमणध्वनीवरून अधिकारी, पत्रकार यांच्याशी संपर्क साधून विस्कळीत यंत्रणेची दरी भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, एकावेळी एकच व्यक्ती भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकतो, त्यात अधिकृतपणे विशिष्ट माहिती मिळवून द्यायची म्हटले की विविध ठिकाणी संपर्क करावा लागतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपट उडत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The city 'voice' of the police stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.