आदर्श प्रगती कॉलनीतील नागरिक अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:17+5:302021-09-03T04:09:17+5:30
नाली खोदकामात केबल तुटली : तक्रार करूनही दखल नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चामट चौकातून उमरेडकडे जाणाऱ्या ...
नाली खोदकामात केबल तुटली : तक्रार करूनही दखल नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चामट चौकातून उमरेडकडे जाणाऱ्या रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जात आहे. येथे गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेसीबीने नालीचे खोदकाम करताना केबल तुटली. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने आदर्श प्रगती कॉलनीतील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
नागरिकांनी वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरण कार्यालयाकडे केली; परंतु केबल दुरुस्तीचे आमचे काम नाही. खासगी कंत्राटदारांकडून काम करण्यासाठी पैसे द्यावे लागतील . असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे खोदकाम करणारा कंत्राटदार केबल तोडल्यापासून बेपत्ता झाला आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली.
दुपारी १२ पासून वीज पुरवठा खंडित झाल्याने आदर्श प्रगती कॉलनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपाने संबंधित कंत्राटदारावर कारवाई तातडीने वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी केली आहे.