सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत आज विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:15 AM2023-02-11T11:15:37+5:302023-02-11T11:19:23+5:30

न्या.बोबडे, न्या. गवई, न्या.गंगापूरवाला उपस्थित राहणार

Cji Chandrachud To Attend Maharashtra National Law University 1st Convocation Ceremony in Nagpur | सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत आज विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत आज विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ

Next

नागपूर : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ ११ फेब्रुवारी राेजी आयाेजित करण्यात आला आहे. भारताचे सरन्यायाधीश न्या.डाॅ.डी.वाय. चंद्रचूड हे या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

वारंगा, बुटीबाेरी येथे विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात सकाळी ११.४० वाजता हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती न्या.भूषण गवई, प्र-कुलपती व मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश न्या.संजय गंगापूरवाला तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.विजेंदर कुमार व कुलसचिव डाॅ.आशिष दीक्षित प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

शैक्षणिक सत्र २०१६ पासून राष्ट्रीय विधि विद्यापीठाची बॅच सुरू झाली आहे. त्यानंतर, काेराेनामुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झाला हाेता. त्यामुळे विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ या वर्षी हाेत आहे. यामध्ये एल.एल.बी. पदवीच्या दाेन बॅच आणि एल.एल.एम. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाच बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात पदवीच्या दाेन बॅचमध्ये एल.एल.बी. झालेल्या १५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यासह २०१६ ते २०२० पर्यंतच्या पाच बॅचमधील ५६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर एल.एल.एम. पदवी समारंभाच्या दरम्यान प्रदान करण्यात येईल. याशिवाय ६ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. शैक्षणिक सत्रात सर्वाेत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना २५ सुवर्ण पदकांनी गाैरविण्यात येणार आहे.

Web Title: Cji Chandrachud To Attend Maharashtra National Law University 1st Convocation Ceremony in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.