रितिका मालूसह इतरांविरुद्ध आर्थिक भरपाईसाठी दावा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 6, 2024 06:43 PM2024-06-06T18:43:11+5:302024-06-06T18:43:59+5:30

रामझुला अपघात प्रकरण : मर्सिडिज कारने दोन तरुणांना चिरडले

Claim for monetary compensation against Ritika Malu and others | रितिका मालूसह इतरांविरुद्ध आर्थिक भरपाईसाठी दावा

Claim for monetary compensation against Ritika Malu and others

राकेश घानोडे
नागपूर :
मद्यधुंद अवस्थेत मर्सिडिज कार चालवून दोन तरुणांना चिरडल्याचा आरोप असलेल्या रितिका उर्फ रितू दिनेश मालू यांच्यासह माधुरी शिशिर सारडा, विष्णू बजरंगलाल मालू, कपिल नाथानी व बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याविरुद्ध मोटार अपघात न्यायाधिकरणमध्ये आर्थिक भरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. या दाव्यावर येत्या ६ जुलै रोजी प्रथम सुनावणी होणार आहे.

ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली. या अपघातात मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) या दोन मित्रांचा मृत्यू झाला. त्यापैकी मोहम्मद आतिफच्या कुटुंबियांनी हा दावा दाखल केला आहे. अपघाताच्या दिवशी रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होत्या. दरम्यान, त्यांची कार अनियंत्रित होऊन आधी रामझुल्याच्या कठड्याला धडकली व त्यानंतर कारने संबंधित तरुणांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. कारमध्ये माधुरी सारडाही बाजूला बसल्या होत्या. दोघीही सीपी क्लब येथे पार्टी करून घरी जात होत्या, असा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध तहसील पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

Web Title: Claim for monetary compensation against Ritika Malu and others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.