स्वच्छ सर्वेक्षणात यंदाही नागपूरची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 09:35 PM2019-03-06T21:35:06+5:302019-03-06T21:36:16+5:30

केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी घोषित झाला. यात गेल्या वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्रशासन अपेक्षित उपाययोजना करू न शकल्याने नागपूर पुन्हा तीन अंकाने पिछाडीवर गेले.

In The Clean survey Nagpur decline | स्वच्छ सर्वेक्षणात यंदाही नागपूरची घसरण

स्वच्छ सर्वेक्षणात यंदाही नागपूरची घसरण

Next
ठळक मुद्दे५५ क्रमांकावरून पोहचले ५८ वर : सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस व सर्टिफिकेशनमध्ये पडले कमी गुण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी घोषित झाला. यात गेल्या वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्रशासन अपेक्षित उपाययोजना करू न शकल्याने नागपूर पुन्हा तीन अंकाने पिछाडीवर गेले.
गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला ४००० पैकी २८३४.९५ गुण मिळाले होते. ४७१ शहरांपैकी नागपूर ५५ क्रमांकावर आले होते. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात ५००० गुण ठेवण्यात आले होते. यातून ३१६०.३१ गुण नागपूरला मिळाले. यात देशभरातून ४२५ शहरांनी भाग घेतला होता. नागपूर ५८ व्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे यावर्षी चंद्रपूरने २९, वर्धा जिल्हा ३४ व्या क्रमाकांवर राहिला.
असे मिळाले गुण
स्वच्छ सर्वेक्षणात डायरेक्ट ऑब्झर्व्हेशन, सिटीजन फिडबॅक, सर्व्हिस लेव्हल प्रोगे्रस व सर्टिफिकेशन यावर प्रत्येकी १२५० गुण होते. २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात डायरेक्ट ऑब्झर्व्हेशनवर नागपूरला ११३८, सिटीजन फिडबॅकवर ९३७.७ गुण मिळाले; पण सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसवर ५३७.६१ व सर्टिफिकेशनवर ५५० गुण मिळाले.
येथे ठरले कमजोर
सिटीजन फिडबॅकमध्ये मनपाने स्वच्छता अ‍ॅप लोकांकडून डाऊनलोड करून घेतला. त्याला चांगला प्रतिसाद नागपूरच्या जनतेने दिला. पण सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमध्ये कचरा संकलन आणि वाहतूक, कचऱ्याचे व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता, स्वच्छतेच्या बाबतीत माहिती, शिक्षण आणि संपर्क, स्वच्छतेच्या बाबतीत कायदे आणि नवीन संशोधन यात विशेष काम करू शकले नाही. त्यामुळे गुणांमध्ये मोठी घसरण झाली; शिवाय सर्टिफिकेशनच्या स्टार रँकिंगमध्ये नागपूरला २ स्टार मिळाले. यात हागणदारीमुक्त शहर यावरसुद्धा गुण होते. त्यातही नागपूर घसरले.
स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरच्या घसरणीला घणकचरा व्यवस्थापन हे कारणीभूत ठरले आहे. शहरात कचरा संकलन होते. पण त्याची विल्हेवाट लावण्यात मनपा अपयशी ठरली आहे; शिवाय मनपाला स्वच्छतेच्या बाबतीत पहिले सहा महिने काहीच करता आले नाही. नवीन आयुक्त आल्यानंतर स्वच्छतेच्या कामात गती आली.
कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

महाराष्ट्रात नागपूर १८ व्या स्थानी
१) मुंबई २) कोल्हापूर ३) मीरा भाईंदर ४) चंद्रपूर ५) अंबरनाथ ६) वर्धा ७) वसई विरार ८) पुणे ९) लातूर १०) सातारा ११) ग्रेटर मुंबई १२) बदलापूर १३) पिंपरी-चिंचवड १४) उदगीर १५) सोलापूर १६) धुळे १७) ठाणे १८) नागपूर.

 

Web Title: In The Clean survey Nagpur decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.