रेल्वे स्थानकावर स्वच्छता राखा
By admin | Published: June 20, 2017 01:57 AM2017-06-20T01:57:31+5:302017-06-20T01:57:31+5:30
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी नागपूर विभागाचा पाहणी दौरा करून विकासकामांची पाहणी केली.
मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी केली पाहणी : प्रशासनाला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी नागपूर विभागाचा पाहणी दौरा करून विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता राखण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी रेल्वेस्थानकावरील वॉटर व्हेंडिंग मशिनची पाहणी करून मशिनच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यांनी फूड प्लाझाचे निरीक्षण केले. पहिल्या माळ््यावरील कॅफेटेरियात अधिक लायटिंग करण्याची सूचना त्यांनी केली.
तिकीट चेकिंग स्टाफ लॉबीमध्ये स्वच्छता ठेवणे, होम प्लॅटफार्मवर सुंदर गार्डन तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय सीसीटीव्हीने घडामोडींवर निरीक्षण ठेवण्यासाठी मॉनिटरची संख्या वाढविण्याच्या तसेच वॉशिंग प्लान्टचे निरीक्षण केले. त्यांनी खासदार हंसराज अहिर यांच्याशी चर्चा करून चंद्रपूर परिसरात गाड्यांना थांबा देण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी विंडो ट्रेलिंग निरीक्षण केले. कोळसा लोडिंग, थर्ड लाईनच्या कामाचा आढावा त्यांनी करून हे प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी आणि अधिकारी उपस्थित होते.