असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे लाभ सर्व सफाई कामगारांना द्यावे : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 10:01 PM2019-03-07T22:01:39+5:302019-03-07T22:03:33+5:30

सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करून त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.

Cleaning workers should be given benefits of unorganized sector: Devendra Fadnavis | असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे लाभ सर्व सफाई कामगारांना द्यावे : देवेंद्र फडणवीस

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे लाभ सर्व सफाई कामगारांना द्यावे : देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देसफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत रामगिरीवर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करून त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, आ. सुधाकर कोहळे, आ.प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, नंदकिशोर महतो, रामसिंग कछवाह, लिला हाथीबेड, विजय चुटेले, सतीश सिरसवान, सुदाम महाजन, राजेश हाथीबेड,अजय हाथीबेड, सतीश डागोर, बाबुराव वामन, राजीव जाधव, मुकेश बारमासे, सामाजिक न्यायविभागाचे सचिव दिनेश वाघमारे, कामगार आयुक्त आर.आर. जाधव, नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाड समितीने सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण काम केले आहे. ठेकेदारी व कंत्राटी पद्धतीतील सफाई कामगारांनाही लाड समितीचे निर्णय लागू करण्यात यावेत. सफाई कामगारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे विचाराधीन असून सफाई कामगारांची सर्व पदे आकृतिबंधानुसार भरण्यात यावीत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पदे तयार करावीत. यासंदर्भातील निकष तपासण्यासाठी चार सदस्यांची समिती तयार करुन समितीने तीन महिन्यात अहवाल द्यावा. असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
नुकतीच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लागू करण्यात आलेली पेन्शन योजनाही सफाई कामगारांना लागू होऊ शकेल. सफाई कामगारांपर्यंत हे लाभ पोहचविण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असेल. सफाई कामगारांंच्या पाल्यांना विविध शिक्षणसुविधा देणे तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. ‘बार्टी’ने यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेऊन या कामगारांच्या मुलांना संबंधित प्रशिक्षण द्यावे. सफाई कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले देण्यात यावीत. तसेच काम करीत असताना सफाई कामगारांचा अपघाती मृत्यू झाला तर निर्देशानुसार मिळणारी मदत संबंधितांना देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

Web Title: Cleaning workers should be given benefits of unorganized sector: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.