जिल्हा न्यायालयात स्वच्छता अभियान
By admin | Published: May 29, 2016 03:03 AM2016-05-29T03:03:22+5:302016-05-29T03:03:22+5:30
भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत जिल्हा न्यायालय प्रशासन, जिल्हा वकील संघ आणि नागपूर
नागपूर : भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत जिल्हा न्यायालय प्रशासन, जिल्हा वकील संघ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी न्यायमंदिर आणि सुयोग इमारत परिसराची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत साफसफाई करण्यात आली.
स्वच्छता अभियानास प्रारंभ करताना गणेडीवाला म्हणाल्या की, सर्व न्यायिक अधिकारी, अधिवक्ता आणि जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी कोणताही भेदभाव न करता एकत्रपणे जिल्हा न्यायालय परिसराची सफाई करावी. या अभियानांतर्गत कचरा उचलण्यासाठी मनपाने पाच ट्रक आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले होते.
याप्रसंगी वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक संजय सिंग, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अॅड. नितीन तेलगोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र बारई, रवींद्र दरक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)