स्वच्छ भारत अभियानाच्या खासगीकरणाचा घाट!

By admin | Published: February 24, 2016 03:11 AM2016-02-24T03:11:19+5:302016-02-24T03:11:19+5:30

स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. ही एक राष्ट्रीय चळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच ..

Cleanliness of the Swachh Bharat Mission of Ghat! | स्वच्छ भारत अभियानाच्या खासगीकरणाचा घाट!

स्वच्छ भारत अभियानाच्या खासगीकरणाचा घाट!

Next

प्रकल्पावर प्रश्नचिन्ह : राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात
गणेश हूड नागपूर
स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. ही एक राष्ट्रीय चळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच या अभियानातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून या अभियानाच्या खासगीकरणाचा घाट राज्य सरकारने घातला आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार स्वयंसेवी संस्थांवर ही जबाबदारी सोपविल्यास राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहे.
अभियानात राज्यात तालुका स्तरावर ११५० तर जिल्हा परिषद स्तरावर ४५० कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला आहे. राज्यभर हागणदारी मुक्तीची चळवळ उभी करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु नवीन धोरणामुळे यातील निम्मे कर्मचारी घरी बसणार आहेत.
पाणी स्वच्छता साहाय्य संस्था व खात्याअंतर्गत कामकाजातील सुसूत्रता व खासगी संस्थांच्या सहभागासंदर्भात चाचपणी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. अभियानातील कर्मचारी गेल्या १२ वर्षांपासून सेवेत आहेत. भविष्यात नोकरीत कायम केले जाईल, या आशेने अनेकांनी खासगी संस्थांतील नोकऱ्या नाकारल्या. परंतु आता त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे.

शासनाचे अद्याप निर्देश नाही
स्वच्छ भारत अभियानात सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्यासंदर्भात शासन स्तरावर प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप शासनाकडून यासंदर्भात कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या विषयावर अधिक माहिती देता येणार नाही.
गणेश चौधरी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

अभियानावर प्रश्नचिन्ह
स्वच्छ भारत अभियान ही एक राष्ट्रीय चळवळ व्हावी, असे आवाहन सत्ताधारी करीत असतानाच शासकीय यंत्रणेला समांतर असे सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागा घेणार आहेत. त्यामुळे या अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हागणदारी मुक्तीला धक्का
राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी गावागावात लोकचळवळ उभी करण्यात कंत्राटी स्वच्छता दूतांची भूमिका महत्त्वाची आहे. घरात शौचालय उभारण्याची हाक देत पहाटे गावाच्या गोदरीत हातात गुलाबाचे फूल घेऊ न उभे राहून लोकांचे मतपरिवर्तन करण्यातही यांची महत्त्वाची भूमिका आहे. या कर्मचाऱ्यांना कमी केल्यास हागणदारीमुक्त अभियानालाही जबर धक्का बसणार आहे.

Web Title: Cleanliness of the Swachh Bharat Mission of Ghat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.