हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारताला ३ ट्रिलियन डाॅलरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2022 07:30 AM2022-03-06T07:30:00+5:302022-03-06T07:30:02+5:30

Nagpur News हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे.

Climate change costs India loss of 3 trillion by 2050 | हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारताला ३ ट्रिलियन डाॅलरचे नुकसान

हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारताला ३ ट्रिलियन डाॅलरचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या २० वर्षात ७९ बिलियन डाॅलरचा फटकाजीडीपीचा ताेटा २ टक्क्यांवर

:

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदलामुळे हाेणारे नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महापूर, भूस्खलन, चक्रीवादळे, उष्ण लहरी किंवा शीतलहरींमुळे हाेणारे नुकसान हे थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. वर्ल्ड मेटरालाॅजिकल ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे. देशाचा जीडीपी १ टक्क्याने कमी झाला असून २०५० पर्यंत हे नुकसान तब्बल ३ ट्रिलियन डाॅलरवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय वने, पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयाचे सदस्य सुरेश चाेपणे यांनी हवामान बदलाच्या परिणामांचे विश्लेषण केले. त्सुनामी, महापूर यामुळे अनेक नागरी वस्त्यांना फटका बसताे, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, राेजगार असे बरेच प्रश्न निर्माण हाेतात. जंगलावर, जैवविविधतेवर परिणाम हाेतात. अतिपाऊस, अवकाळी पावसाने शेतीला नुकसान हाेते. शेकडाे वर्षांपासून शेतकरी ऋतूंच्या ठराविक वेळेनुसार शेतीची मशागत करीत आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे शेतीला फटका बसला आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी पाऊस येणे हे त्याचे उदाहरण आहे. यामुळे अन्नसुरक्षा प्रभावित झाली असून अन्नधान्य आयात करण्याची वेळ आली आहे. केवळ शेती नाही तर हवामान बदलाच्या प्रत्येक घडामाेडीमुळे मॅनुफॅक्चरिंग, रिटेल, टूरिझम, बांधकाम क्षेत्र, ट्रान्सपाेर्ट उद्याेगालाही फटका सहन करावा लागताे आहे आणि या घटनांचे सातत्य वाढले आहे. ही खरी धाेक्याची घंटा आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आकलनापेक्षा किती तरी अधिक असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशात ५० वर्षांत ३५० माेठ्या घटना

- १९९० ते २०२० पर्यंत सरासरी १.५ डिग्री तापमान वाढले.

- १९७० ते २०२० दरम्यान देशात हवामान बदलाच्या ३५० घटना घडल्या.

- त्सुनामी, मुंबईचा महापूर, केरळचा महापूर, चेन्नई पूर, केदारनाथ भूस्खलन, लेह भुस्खलन, पूर्व-पश्चिम दिशेची भारतीय वादळे, उष्ण लहरी, थंड लहरी.

- भारतातील ७५ टक्के जिल्हे हे क्लायमेट हॉटस्पॉट आहेत.

- देशातील २७ टक्के भूभागावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.

- मागील १५ वर्षांत ७९ जिल्हे हे दुष्काळ प्रभावित आणि २६ जिल्हे वादळे प्रभावित झाले आहेत.

भारताची स्थिती काय?

- भारताचा जागतिक हवामान बदल जोखीम निर्देशांक ७ वा आहे.

- भारताचा हवामान आपत्ती निर्देशांक ३ रा आहे.

-भारताचे गेल्या २० वर्षांत ७९.५ बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- भारताचे अति पावसामुळे १० बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- ‘काॅस्ट ऑफ क्लायमेट रिस्क इन इंडिया’च्या अहवालानुसार भविष्यात देशाचा दरवर्षी २.६ टक्के जीडीपी कमी होईल.

- १ डिग्री तापमान वाढीमुळे देशाचा ३ टक्के जीडीपी कमी होऊ शकतो. २०५० पर्यंत ४ टक्के जीडीपी कमी होण्याचा धोका.

 

देशातील कमी होत चाललेले जंगल, वाढलेले प्रदूषण आणि शहरीकरण यामुळे हवामान बदलाची गती वाढली आहे. देशाच्या एकूणच प्रगतीत हवामान बदल अडसर ठरत असून एकूण जीडीपीचे २% नुकसान होत आहे. आपण त्वरित हवामान बदल रोखू शकलो नाही तर देशाच्या सर्वच क्षेत्राचे, विशेषतः कृषी, आरोग्य आणि पर्यटन उद्योगाचे फार नुकसान होणार आहे.

- सुरेश चाेपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट साेसायटी

Web Title: Climate change costs India loss of 3 trillion by 2050

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.