वातावरण बदलाचा मृग बहराला बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:02+5:302021-05-20T04:09:02+5:30

ब्रिजेश तिवारी कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची ...

Climate change will hit deer deaf | वातावरण बदलाचा मृग बहराला बसणार फटका

वातावरण बदलाचा मृग बहराला बसणार फटका

Next

ब्रिजेश तिवारी

कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा काटोल आणि नरखेड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना गत तीन वर्षांपासून बसतो आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. प्रसंगी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. रबीच्या गहू,चना या पिकांचे उत्पादन कमी असूनही भाव मिळाला नाही. यंदा उन्हाळ्यात तापमानात योग्य वाढ झाली नाही. सतत ढगाळ वातावरण व वादळी पावसाच्या फटक्याने संत्रा बागा थंडावल्या. बहुतांश संत्रा उत्पादकांच्या बागामध्ये मृग बहराची फूट होण्याची शक्यता कमी झाली आहे. अक्षय तृतीयेपासून शेतकरी संत्रा झाडांना पाणी देणे बंद करतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात संत्रा झाडे वाळू लागतात. ग्रामीण भाषेत याला झाडाला ताण देणे असे म्हणतात. नंतर जूनमध्ये जोरदार पाऊस येतो तेव्हा ही संत्रा झाडे पांढऱ्या फुलांनी बहरून जातात. नंतर याच फुलांचे रुपांतर फळात होते. पण वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदा या प्रक्रियेत खंड पडला. यामुळे बहार फुटण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी पावसामुळे संत्रा झाडांना पुरेसा ताणच मिळाला नाही. त्यामुळे यंदा मृग बहारच्या संत्र्यांची फूट कमी होणार. फूट झाली तरी मोठ्या प्रमाणात गळती होणार अशी माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ.प्रदीप दवने यांनी दिली आहे.

Web Title: Climate change will hit deer deaf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.