‘सुपरमून’ पाहण्याची संधी ढगांनी हिरावली! १४ पट माेठा, ३० पट तेजस्वी तर अंतर तब्बल ३,५७,५३० किमी

By निशांत वानखेडे | Published: August 1, 2023 07:09 PM2023-08-01T19:09:33+5:302023-08-01T19:10:36+5:30

मंगळवारी आकाशातील चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याने नेहमीपेक्षा माेठा आणि तेजस्वी दिसणार हाेता.

Clouds lost the opportunity to see the Supermoon 14 times brighter, 30 times brighter and the distance is 3,57,530 km | ‘सुपरमून’ पाहण्याची संधी ढगांनी हिरावली! १४ पट माेठा, ३० पट तेजस्वी तर अंतर तब्बल ३,५७,५३० किमी

‘सुपरमून’ पाहण्याची संधी ढगांनी हिरावली! १४ पट माेठा, ३० पट तेजस्वी तर अंतर तब्बल ३,५७,५३० किमी

googlenewsNext

नागपूर: मंगळवारी आकाशातील चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याने नेहमीपेक्षा माेठा आणि तेजस्वी दिसणार हाेता. पृथ्वीभाेवती फिरताना चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असताना पाैर्णिमा असते, त्या पाैर्णिमेला ‘सुपरमून’ असे म्हटले जाते. मात्र अवकाशातील विलाेभणीय व सुंदर असा चंद्र पाहण्याची संधी ढगांनी हिरावली. पृथ्वीभाेवती अंडाकृती गतीने फिरताना चंद्र वर्षातून काही वेळा पृथ्वीच्या जवळ येताे. त्यावेळी पाैर्णिमा असली की सुपरमून हाेताे. आजही तीच रात्र असून, आज पृथ्वीपासून चंद्र ३,५७,५३० किलाेमीटर अंतरावर म्हणजे २,२२,१५८ मैल अंतरावर आहे.

 चंद्र सर्वात दूर असताे, त्यावेळी हे अंतर ४ लाख किलाेमीटरच्या वर असते. सध्या जवळ असल्याने हा चंद्र तब्बल १४ पट माेठा आणि ३० टक्क्यांनी अधिक तेजस्वी दिसताे. त्याला पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते व साध्या डाेळ्यांनीही या सुपरमूनचे सुंदर दर्शन हाेऊ शकते. सायंकाळी सूर्य मावळताच पूर्वेकडे या सुपर चंद्राचा उदय झाला व रात्रभर त्याचे दर्शन हाेत राहिले. मात्र सायंकाळी संपूर्ण आकाश ढगांनी व्यापल्याने नागपूरकरांना या सुपरमूनचे दर्शन घडू शकले नाही.

३१ ऑगस्टला ‘ब्ल्यू मून’ नक्की बघा
१ ऑगस्टचा सुपरमून पाहिला नसेल तर निराश हाेऊ नका. आकाशातील चंद्राचे त्यापेक्षा माेहक दर्शन येत्या ३१ ऑगस्ट राेजी हाेणार आहे. यावेळी ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात दाेनदा पाैर्णिमा येईल. एकाच महिन्यात दाेन पाैर्णिमा आल्यास पहिला सुपरमून तर दुसरा ‘ब्ल्यू मून’ असे म्हणतात. ३१ ऑगस्टला या ब्ल्यू मूनचे सर्वांग सुंदर दर्शन घडणार आहे. या दिवशी चंद्र सुपरमूनपेक्षा कमी अंतरावर म्हणजे ३,५७,३४४ किमी किंवा २,२२,०४३ मैल अंतरावर असेल. त्यावेळी चंद्र सुपरमूनपेक्षा अधिक तेजस्वी भासेल. तेव्हा ३० व ३१ ऑगस्टला ब्ल्यू मून पाहण्याची संधी साेडू नका.

Web Title: Clouds lost the opportunity to see the Supermoon 14 times brighter, 30 times brighter and the distance is 3,57,530 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर