CM Covid Relief Fund : मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:41 PM2021-12-15T13:41:24+5:302021-12-15T13:41:47+5:30

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदत निधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे.

CM Covid Relief Fund less Donors are giving donation to CM Covid Relief Fund | CM Covid Relief Fund : मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ

CM Covid Relief Fund : मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ

googlenewsNext

योगेश पांडे 
नागपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदत निधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत तर नोव्हेंबरमधील दानदात्यांची संख्या अवघी ०.९० टक्के इतकी आहे. याशिवाय मुख्यमंत्री मदत निधी व मुख्यमंत्री कृषी मदत निधीकडे देखील दात्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

असा घटला आकडा

कोविड मदतनिधीत २०२१ मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३९ हजार ८७९ नागरिकांनी १९४ कोटी रुपये जमा केले. 

जानेवारी महिन्यात ३३१ जणांनी १ कोटी ५३ लाख रुपयांचे सहकार्य केले होते. ऑगस्टमध्ये दात्यांचा आकडा १९ हजार ७९ वर पोहोचला व महिनाभरातच ८५ कोटींची रक्कम जमा झाली. 

त्यानंतर सतत मदतीचा ओघ घटत गेला. नोव्हेंबरमध्ये दात्यांची संख्या घटून १५२ वर पोहोचली व मदतीचा आकडा ८० लाख ५ हजार इतकाच होता.

 

नैसर्गिक संकट, वैद्यकीय उपचार यासारख्या बाबींसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून जनतेला मदत करण्यात येते. 

या निधीत वर्षभरात ४ हजार १९१ लोकांनी मदत केली व यातून ५१ कोटी १० लाखांचा निधी गोळा झाला.

Web Title: CM Covid Relief Fund less Donors are giving donation to CM Covid Relief Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.