VIDEO: फडणवीस निघता-निघता शिंदे आले; बाजूला नेत कानात काहीतरी सांगितले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:35 AM2023-12-08T10:35:48+5:302023-12-08T10:38:27+5:30
लोकमतने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती.
सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. अधिवेशनाचा पहिल्या दिवसाचं काम संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदार यांच्यासाठी लोकमत समूहाने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री आणि आमदारांनी उपस्थिती लावली.
देवेंद्र फडणवीस स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात आधी पोहोचले होते. एकनाथ शिंदेंना पोहोचायला थोडा उशीर झाला. शिंदे कार्यक्रमस्थळी आले, तेव्हा फडणवीस निघतच होते. ''आम्ही खाऊनपिऊन निघालो आता...'', असं फडणवीस शिंदेंना म्हणाले आणि दोघंही हसले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना बाजूला बोलवत त्यांच्या कानात काहीतरी सांगितल्याचे दिसून आले. त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं असेल, याबद्दलची कुजबूज नंतर सुरू झाली.
"ए आमचा एक फोटो चांगला काढा..." -
एका व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार गळाभेट घेताना दिसत आहेत. यावेळी, देवेंद्र फडणवीस कॅमेरामनला, "ए आमचा एक फोटो चांगला काढा," असे म्हणताना दिसत आहेत.