संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार

By योगेश पांडे | Published: April 27, 2023 12:21 PM2023-04-27T12:21:36+5:302023-04-27T12:26:32+5:30

सरसंघचालक सर्वांसाठी प्रेरणास्थान असल्याची भावना

CM Eknath shinde praises RSS chief Mohan Bhagwat at the event of cancer hospital inauguration in nagpur | संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार

संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार

googlenewsNext

नागपूर : संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उदघाटन कार्यक्रमात ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह एकाच मंचावर होते.

सरसंघचालक मोहन भागवत हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी त्यांचे वैचारिक पाठबळ नेहमीच असते. एनसीआयच्या रुपातून हेच दिसून येत आहे. या इस्पितळाला फाईव्ह स्टार नव्हे तर सेवन स्टार घ्यायला हवेत असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी ते काहीसे भावुकदेखील झाले.

देवेंद्र फडणवीस यांनी कॅन्सरमुळे त्यांचे वडील गमावले त्याचप्रमाणे माझी आईदेखील ती वेदनादायी आठवण आहे. मात्र वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून सार्वजनिक दुःखावर उपाय शोधण्याचा विचार करणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे. तेच फडणवीस यांनी दाखवून दिले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: CM Eknath shinde praises RSS chief Mohan Bhagwat at the event of cancer hospital inauguration in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.