‘सीएम’कडून मदतीचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:45 AM2019-04-18T00:45:38+5:302019-04-18T00:49:23+5:30

मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१६ पासून तीन वर्षांत मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी थोडीथोडकी नव्हे तर ४८९ कोटींहून अधिक रकमेची मदत करण्यात आली. विशेषत: दरवर्षी येणारे अर्ज व मंजूर अर्थसाहाय्य यांचा आकडा वाढत जातोय. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

'CM' helped speed up | ‘सीएम’कडून मदतीचा वेग वाढला

‘सीएम’कडून मदतीचा वेग वाढला

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री साहाय्यता निधीतून तीन वर्षांत ४८९ कोटींहून अधिकची मदतदानदात्यांचादेखील विश्वास वाढीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१६ पासून तीन वर्षांत मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी थोडीथोडकी नव्हे तर ४८९ कोटींहून अधिक रकमेची मदत करण्यात आली. विशेषत: दरवर्षी येणारे अर्ज व मंजूर अर्थसाहाय्य यांचा आकडा वाढत जातोय. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मुख्यमंत्री सचिवालयाकडे विचारणा केली होती. २०१६ सालापासून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किती रुपयांची मदत झाली, किती नागरिकांचे अर्ज आले, यातील किती रुग्ण होते तसेच नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या पुनर्वसनासाठी किती मदत करण्यात आली, इत्यादी प्रश्न माहितीच्या अधिकारांतर्गत विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ७४ हजार १३८ नागरिकांचे अर्ज आले. यातील ४८ हजार ४५७ अर्ज मंजूर झाले. २०१६ साली १५ हजार ५६६ अर्ज आले होते. २०१७ साली हा आकडा २३ हजार ७५३ इतका होता, तर २०१८ मध्ये ३४ हजार ८१९ जणांनी अर्ज केले. या सर्वांना मिळून ४८९ कोटी ४९ लाख ७४ हजार ९९४ रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. १५ हजार ३१९ जणांचे अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आले.
दानदात्यांकडून मदतीचा ओघ वाढला
मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या बँक खात्यात दानदात्यांकडूनदेखील मदतीचा ओघ वाढला. साहाय्यता निधीत १० लाखाहून अधिक रक्कम देणगी म्हणून देणाऱ्यांची तीन वर्षांतील संख्या ही ३६९ इतकी होती. त्यांच्याकडून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत ७७ कोटी ४१ लाख ९० हजार ६९२ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
 

 

Web Title: 'CM' helped speed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.