नागपुरात आपली बसच्या ताफ्यात सीएनजी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 08:14 PM2019-02-25T20:14:52+5:302019-02-25T20:18:51+5:30

डिझेल बसमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असून इंधन खर्चही अधिक आहे. परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाने डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवर्तित करण्यात आलेली एक बस आपली बसच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

CNG bus in Apali buses troupe at Nagpur | नागपुरात आपली बसच्या ताफ्यात सीएनजी बस

नागपुरात आपली बसच्या ताफ्यात सीएनजी बस

Next
ठळक मुद्दे५० बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिझेल बसमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत असून इंधन खर्चही अधिक आहे. परिवहन सेवा प्रदूषणमुक्त व खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाने डिझेलवर धावणाऱ्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवर्तित करण्यात आलेली एक बस आपली बसच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील बसेस सीएनजीवर धावतात. याच धर्तीवर लवकरच नागपूर शहरातील सार्वजनिक परिवहन सेवेतील ५० बसेस सीएनजीवर धावणार आहेत. याबाबतचा करार पुणे येथील रॉमेंट कंपनीने महापालिकेशी केला आहे. याचा महापालिकेवर कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक बोजा पडणार नाही. सोबतच इंधनावरील खर्च कमी होणार आहे. कंपनी आधी डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करणार आहे. सोबतच सीएनजी उपलब्ध करणार आहे. परिवहन समितीने यासाठी पुढाकार घेतला होता.
परिवहन विभागाला डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित के ल्यानंतर सीएनजी उपलब्ध करण्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रॉमेंट कंपनीकडून याचा पुरवठा केला जाणार आहे. आपली बसच्या ताफ्यात दाखल झालेल्या सीएनजी बसचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते २ मार्चला होणार असल्याची माहिती परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली.
तोटा कमी होण्याला मदत
डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याने परिवहन विभागाचा इंधनावरील खर्च कमी होईल. सीएनजी पर्यावरणपूरक असण्यासोबतच महापालिकेसाठी फायदेशीर ठरणार आहे. यातून परिवहन विभागाचा तोटा काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
सीएनजी डेपो उभारणार
आपली बसच्या ताफ्यातील ५० डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्यात येणार आहे. यासाठी सीएनजीची गरज भासणार असल्याने नागपुरात सीएनजी डेपो उभारला जाणार आहे. भविष्यात भांडेवाडी येथे बायो सीएनजी तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दिव्यांगांना मोफत प्रवास
दिव्यांगांना शहर बस्मधूत मोफत प्रवास करता येणार आहे. २ मार्च २०१९ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दिव्यांगासोबत असणाऱ्या एका व्यक्तीला मोफत प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी दिव्यांगांना समाजकल्याण विभागाकडून देण्यात आलेले कार्ड वाहकांना दाखवावे लागतील.

 

Web Title: CNG bus in Apali buses troupe at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.