सहकार भारती नागपूर महानगरची कार्यकारिणी घोषित
By admin | Published: June 26, 2017 02:04 AM2017-06-26T02:04:16+5:302017-06-26T02:04:16+5:30
सहकार भारती नागपूर महानगरच्या कार्यकारिणीची घोषणा विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केली.
कार्यकारिणी अध्यक्षपदी किरण रोकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहकार भारती नागपूर महानगरच्या कार्यकारिणीची घोषणा विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भरत महाशब्दे यांची निवड करण्यात आली. महामंत्री किरण रोकडे, उपाध्यक्ष राजेंद्र घाटे, घनश्याम कुकरेजा, स्वप्निल मोंढे, अभिजित केळकर, सचिव जयंत दीक्षित, भास्कर पराते, कोषाध्यक्ष गंगाधर लेंडे, महिला प्रमुख वृशाली शिलेदार, महिला सहप्रमुख सीमा सहस्रभोजनी, बचत गट प्रकोष्ठ प्रमुख गीता सहारे, पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख दिनेश शाहू, पतसंस्था प्रकोष्ठ सहप्रमुख संजय दहेलीकर, हाऊसिंग संस्था प्रकोष्ठ प्रमुख रुपेश मोहाडीकर, कार्यकारिणी सदस्य म्हणून सुधाकर इंगोले, अनघा मुळे, उर्मिला सराफ, प्रा. क्षीरसागर, सेवक मोहाडीकर, मोहन दामी, वसंत भिसेकर, सागर मेश्राम, यांची निवड करण्यात आली.