राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 09:04 PM2023-04-24T21:04:10+5:302023-04-24T21:04:41+5:30

Nagpur News रेल्वेद्वारे कोळशाची लोडिंग वाढविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोळशाचा समाधानकारक साठा होण्यास वेळ लागणार आहे.

Coal crisis in state's power stations; Loading by rail increased, but not enough stock | राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही

राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही

googlenewsNext

नागपूर : वीज केंद्रांमध्ये कोळसा टंचाई निर्माण झाल्याने राज्यावर वीज संकट ओढवण्याची शक्यता आहे. सातत्याने होत असलेल्या बैठकांमुळे महानिर्मिती, कोळसा कंपन्या व रेल्वेमध्ये समन्वय वाढला आहे. रेल्वेद्वारे कोळशाची लोडिंग वाढविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोळशाचा समाधानकारक साठा होण्यास वेळ लागणार आहे.

राज्यातील नाशिक, भुसावळ, पारस व परळी या वीजकेंद्रात कोळशाचा नाममात्र साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या बडनेरा सेक्शनमध्ये थर्ड लाइनच्या बांधकामासाठी ब्लॉक घेतले जात आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांची गती मंदावली आहे. यामुळे नाशिक, भुसावळ, पारस व परळी या वीज केंद्रांना होणारा कोळसा पुरवठा प्रभावित झाला आहे. आता रेल्वे, कोळसा कंपनी व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर कोळसा पुरवठ्यात वाढ झाली आहे. आता दररोज ११ रॅकऐवजी १४ रॅक पुरवठा होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारली आहे. नाशिकमध्ये ४, भुसावळ १, पारस २ व परळी येथे ३.५ दिवस पुरेल, एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्यामुळे परिस्थिती संवेदनशील आहे.

चार युनिट बंद

- कोळसा संकटामुळे महानिर्मितीचे चार युनिट ठप्प झाले आहेत. यात कोराडी वीज केंद्रातील युनिट क्रमांक ३, ६ व ९, तसेच चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ६ चा समावेश आहे. गॅस टंचाईमुळे उरण प्रकल्पातील ३ युनिट बंद आहेत.

Web Title: Coal crisis in state's power stations; Loading by rail increased, but not enough stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.