१४ पिल्लांसह काेब्रा सापाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:54+5:302021-07-14T04:11:54+5:30
रामटेक : तालुक्यातील काचूरवाही येथे रविवारी १४ पिल्ले व काेब्रा साप परिसरात चर्चेचा विषय ठरला. एका गाेठ्यात पिल्लांसह काेब्रा ...
रामटेक : तालुक्यातील काचूरवाही येथे रविवारी १४ पिल्ले व काेब्रा साप परिसरात चर्चेचा विषय ठरला. एका गाेठ्यात पिल्लांसह काेब्रा आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी काचूरवाही गाव गाठले. सर्पमित्रांनी सापाला ताब्यात घेत जंगलात सुखरूप साेडले.
झाले असे की, काचूरवाही येथील अशाेक नाटकर यांच्या घरालगतच्या गाेठ्यात माेठा नाग व त्याची १४ पिल्ले आढळून आली. याबाबत रामटेकच्या वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र राहुल काेठेकर यांना माहिती देण्यात आली. सर्पमित्रांनी काचूरवाही गाठत सापाला पकडले. हा साप विषारी ब्राऊन काेब्रा (नाग) असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. गाेठ्यातून साप पकडताना तिथे नागाची पिल्ले दिसून आली. सर्पमित्र मंथन सरभाऊ, राहुल काेठेकर, अजय मेहरकुळे, अंकित टक्कामाेरे यांनी नागासह त्याच्या १४ पिल्लांना ताब्यात घेत त्यांना जीवदान दिले. त्यानंतर वन अधिकारी अगळे, वनरक्षक यांच्या मदतीने सर्पमित्रांनी काेब्रा व त्याच्या पिल्लांना जंगलात सुखरूप साेडले. यावेळी राहुल खरकाटे, राेशन खरकाटे, निक्की विश्वकर्मा आदींनी सहकार्य दिले.