चातुर्मासात नारळ महागणार : उत्पादनात ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:40 AM2018-08-03T01:40:17+5:302018-08-03T01:43:01+5:30

गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Coconut Price grows in Chaturmas: 50% reduction in production | चातुर्मासात नारळ महागणार : उत्पादनात ५० टक्के घट

चातुर्मासात नारळ महागणार : उत्पादनात ५० टक्के घट

Next
ठळक मुद्दे किरकोळमध्ये चढ्या भावात विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चातुर्मासात नारळाला मागणी
चातुर्मासात अनेक धार्मिक कार्य असल्यामुळे पूजेसाठी नारळाचे महत्त्व असते. या दिवसात नारळाला मागणी वाढते. चातुर्मासात नागपुरात तीन लाखांपर्यंत नारळाची विक्री होते. नारळाचे ठोक विक्रेते सुनील कोकनट कंपनीचे संचालक धनश्याम छाबरिया यांनी सांगितले की, नागपुरात तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि गोवा येथून नारळाची आवक होते. चारही राज्यांमध्ये उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे भाव वाढणार आहे. श्रावण महिन्यात भाविकांना जास्त दरात नारळ खरेदी करावे लागणार आहे.
आवक घटली
पाच वर्षांपूर्वी नागपुरात दररोज २५ ते ३० ट्रक नारळाची आवक होती. प्रत्येक ट्रक पाच लाख दराने एकूण दीड कोटींची उलाढाल व्हायची. नागपुरात संपूर्ण विदर्भात नारळ विक्रीस जायचे. पण आता तेथील व्यापाऱ्यांनी चारही राज्यातून नाराळाची खरेदी वाढविल्यामुळे नागपुरातून जावक कमी झाली आहे. सध्या नागपुरात नारळाचा व्यापार अर्ध्यावर आला आहे. आता १० ते १२ ट्रकची आवक आहे. पूर्वीच्या तुलनेत नारळाचे व्यापारीही कमी झाले आहेत. सध्या १० ते १२ व्यापारी हा व्यापार करीत आहेत. भाव वाढले, पण सध्या भाविकांकडून नारळाला मागणी कमी असल्यामुळे माल पडून आहे.
किराणा मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष छाबरानी म्हणाले, संपूर्ण भारतात बेंगळुरूपासून ९० कि़मी. अंतरावरील वनियममारी येथे सर्वाधिक नारळाचे उत्पादन होते. येथील नारळ सर्वोत्कृष्ट समजले जाते. पण या ठिकाणी कमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला. केवळ २० टक्के उत्पादन झाले. तसेच कमी पावसामुळे नारळाची झाडे आजाराने खराब झाली. त्याचाही फटका उत्पादनाला बसला.
सध्या बाजारात सुके आणि ओल्या नाराळाची आवक आहे. १०० भरतीच्या ओल्या नारळाची किंमत १६०० रुपये आहे. १५ दिवसात १०० रुपयांची वाढ झाली आहे. तर २०० भरतीचे सुके नारळाची किंमत ४२०० रुपये आहे. हे नारळ ठोकमध्ये १६ ते २० रुपयांदरम्यान आहेत. किरकोळमध्ये ३० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. पुढे आवक कमी झाल्यास भाविकांना पूजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

Web Title: Coconut Price grows in Chaturmas: 50% reduction in production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.