विदर्भात पुन्हा वाढली थंडी; पारा १०.१ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:12 AM2020-02-20T11:12:20+5:302020-02-20T11:12:50+5:30
बुधवारी नागपूर संपूर्ण विदर्भात थंड राहिले. रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ६ अंशाच्या खाली १०.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे रात्रीच्या वेळी थंडीत वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी नागपूर संपूर्ण विदर्भात थंड राहिले. रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ६ अंशाच्या खाली १०.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे रात्रीच्या वेळी थंडीत वाढ झाली आहे.
रात्रीच्या तापमानात २४ तासात १.२ अंशाने घट झाली आहे. दिवसाचे तापमान १.२ अंश वाढून ३३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अशा स्थितीत नागपुरात सकाळच्या वेळी नागरिकांना उष्णता जाणवत आहे तर रात्री थंडी वाढत आहे.
हवामान विभागानुसार उत्तर भारतात पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आकाश स्वच्छ आणि वातावरण कोरडे आहे. यामुळे रात्रीचे तापमान कमी झाले आहे.