नागपुरात थंडी कायमच, गोंदिया गारठलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:58+5:302021-01-17T04:07:58+5:30
नागपूर : शहरातील थंडी दोन-तीन दिवसांनंतरही कायमच आहे. दिवसभर गारवा जाणवत होता. सायंकाळी बदललेल्या वातावरणात थंडी अधिक जाणवत होती. ...
नागपूर : शहरातील थंडी दोन-तीन दिवसांनंतरही कायमच आहे. दिवसभर गारवा जाणवत होता. सायंकाळी बदललेल्या वातावरणात थंडी अधिक जाणवत होती. तर गोंदियात दोन दिवसांपासून थंडीचा कडाका कायमच आहे. विदर्भात सर्वाधिक थंडी गोंदियात ८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आली.
नागपूर शहराचे शनिवारचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मागील २४ तासांमध्ये शहरातील किमान तापमानात २.२ अंश सेल्सिअसची वाढ नोंदविण्यात आली आहे. दुपारच्या तुलनेत सायंकाळी वातावरणात बराच गारवा जाणवत होता. शहराचे तापमान सायंकाळनंतर खालावलेले नोंदविण्यात आले. शहरातील आर्द्रता सकाळी ५५ टक्के होती, मात्र सायंकाळी त्यात घट होऊन ४३ नोंदविण्यात आली. वातावरण स्वच्छ असल्याने आकाश निरभ्र होते. त्यामुळे दृश्यताही २ ते ४ किलोमीटर असल्याची नोंद घेण्यात आली.
...
विदर्भातील तापमान
विदर्भात गोंदिया सर्वाधिक थंड होते. मागील तीन दिवसांपासून तिथे थंडीचा पारा कायम आहे. त्या पाठोपाठ नागपुरातही १२.६ अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली. बुलडाणा, वाशिम आणि अकोल्यातील किमान तापमान मात्र अनुक्रमे १८.२ १७.८ आणि १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चंद्रपूर व गोंदियात अनुक्रमे १३.६ व १३.२ अंश तापमानाची नोंद झाली. वर्ध्यात १४ अंश सेल्सिअस तर यवतमाळ आणि अमरावतीमध्ये १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
...