थंडी पुन्हा परतली, वातावरण राहणार ढगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:39+5:302021-01-25T04:08:39+5:30
नागपूर : गेल्या २४ तासांनंतर विदर्भातील जिल्ह्यात थंडी पुन्हा परतली आहे. नागपूर आणि गडचिरोलीतील तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात ...
नागपूर : गेल्या २४ तासांनंतर विदर्भातील जिल्ह्यात थंडी पुन्हा परतली आहे. नागपूर आणि गडचिरोलीतील तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, गोंदियामध्ये पारा १० अंशावर आला आहे.
विदर्भात गोंदियाचा पारा पुन्हा खालावला आहे. तिथे गेल्या २४ तासांत किमान तापमानाचा पारा १० अंशावर आला, तर नागपूर आणि गडचिरोलीमध्ये १२ अंशावर आला आहे. वधरा जिल्ह्यातही १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २६ जानेवारी या काळात हवामानामध्ये अचानक बदल घडण्याची शक्यता आहे. यामुळे नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या ठिकाणी आकाश ढगाळ राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये हवामानात किंचित बदल संभवतो, पण पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या परिसरात ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी तुरळक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
...
कापलेले पीक सांभाळा
वातावरणातील बदलामुळे पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली शेतातील कापलेले पीक सांभाळावे, अशी सूचनाही हवामान विभागाने दिली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा पर्जन्यमान ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
...