थंडीचा रेल्वे गाड्यांना फटका
By admin | Published: December 29, 2014 02:49 AM2014-12-29T02:49:21+5:302014-12-29T02:49:21+5:30
दररोज उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे.
नागपूर : दररोज उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. मागील आठ दिवसांपासून हीच स्थिती असून यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
दाट धुके पडल्यामुळे लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे कठीण झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वेगाड्यांची वाट पाहून प्रवासी कंटाळले असून त्यांना नाहक रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे.
दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस ८.३० तास, १२५९१ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ४ तास, १२२९५ बंगळुर-पटणा संघमित्रा एक्स्प्रेस १.५० तास, १२२९६ पटणा-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ७ तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ३ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १.४५ तास, १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ३.३० तास, १२२७० हजरत निजामुद्दीन-चेन्नई एक्स्प्रेस ३.३० तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस ११ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस ३.३० तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहे.
दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)