राजकारणामुळे सहकार चळवळीचा ऱ्हास

By admin | Published: July 9, 2016 02:58 AM2016-07-09T02:58:19+5:302016-07-09T02:58:19+5:30

एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणारी सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. चळवळ मूळ उद्दिष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दिष्टपूर्तीची साधन झाली आहे.

The collapse of the cooperative movement due to politics | राजकारणामुळे सहकार चळवळीचा ऱ्हास

राजकारणामुळे सहकार चळवळीचा ऱ्हास

Next

उपराष्ट्रपती मो.हमीद अन्सारी : नागपूर नागरिक सहकारी बँकेचा ५५ वा स्थापना दिन
नागपूर : एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणारी सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. चळवळ मूळ उद्दिष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दिष्टपूर्तीची साधन झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकार क्षेत्राचा राजकीय फायद्यासाठी वापर वाढला आहे. राजकारणामुळे सहकारी चळवळीचा ऱ्हास होत आहे, असे परखड मत उपराष्ट्रपती मो. हमिद अन्सारी यांनी व्यक्त केले. नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ व्या स्थापना दिवस समारंभादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते.
देश घडवणाऱ्या नेत्यांनी सहकारी चळवळीकडे वेगाने आर्थिक विकास करण्याचे साधन म्हणून बघितले होते. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही दशकांत देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचा मौलिक वाटा होता. महाराष्ट्राने तर या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला.
परंतु त्यानंतर सहकार क्षेत्रातून काही ठराविक व्यक्तींनाच फायदा होत गेला. तळागाळातील सहकार कमकुवत होत गेला. आर्थिक उदारीकरणानंतर खासगीकरणाचे सहकारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले.

व्यवस्थापन कौशल्याचा अभाव
नागपूर : प्राथमिक स्वरूपाच्या कृषी पतसंस्थांकडील साधनसामुग्रीची उणीव, व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्याचा अभाव यामुळे सहकार क्षेत्र आणखी माघारत गेले, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले.
महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमुळे सहकारी चळवळ चांगलीच फोफावली व सहकारी क्षेत्राने प्रचंड प्रगती केली. परंतु गुजरात, कर्नाटक वगळता देशाच्या इतर राज्यांत हे चित्र दिसले नाही. वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी सहकारी बँकांनी मोठे योगदान दिले आहे. काही मोजक्या बँकांमुळे सहकारी बँकांबाबत गैरसमज आहेत. परंतु देशाच्या विकासात या क्षेत्राची मौलिक भूमिका आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करण्याची आमची भूमिका आहे, असे गडकरी म्हणाले. नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी प्रास्ताविक केले. महेश तिवारी यांना संचालन केले तर राजेश लखोटिया यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

कृषी विमा व्यवसायात सहकार क्षेत्राला प्रचंड संधी
नव्या विमा कायद्यामुळे कृषी विमा व्यवसायाच्या क्षेत्रात सहकारी संस्थासाठी प्रगतीची मोठी संधी निर्माण झाली. यासाठी त्यांनी इतर सेवा प्रदान करणाऱ्यांसोबत भागीदारी केली पाहिजे. सोबतच कृषी संस्थांच्या माध्यमातून अधिक जमीन व व्यावसायिक साधनांची जुळवाजुळव करणे, समन्वयासाठी तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग इत्यादी माध्यमातून सहकार क्षेत्राला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकेल, असा विश्वास उपराष्ट्रपती मो.हामिद अन्सारी यांनी व्यक्त केला.
नागपुरातच देशाचे ‘केंद्र’
ब्रिटिशांच्या काळात नागपूर देशाच्या केंद्रस्थानी होते. आता देशाचे भौगोलिक केंद्र थोडे वेगळे असले तरी लोक नागपूरलाच खरे ‘केंद्र’ मानतात असे सूचक विधान उपराष्ट्रपतींनी केले.

Web Title: The collapse of the cooperative movement due to politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.