अजनीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:10+5:302021-04-25T04:08:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अजनी रेल्वे परिसरात एका क्वार्टरमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी रेल्वे परिसरात एका क्वार्टरमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. आरोपींमध्ये अजनी, कौशल्यानगर, गल्ली नंबर १७ येथील वैभव ज्ञानेश्वर घोडेस्वार (२०), अमन सुनील नागदिवे (१८) आणि त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांचा समावेश आहे.
पीडिता ११ वीची विद्यार्थिनी आहे. काही वर्षांपूर्वी तिचे वडील घर सोडून निघून गेले. तेव्हापासून आई काम करून तिचे पालनपोषण करते. गुरुवारी सकाळी वैभवने तिला बाईकवरून फिरवून आणण्याचे सांगून अजनी रेल्वे क्वॉर्टरवर आणले. तिथे आधीच वैभवचा मित्र अमन आणि त्याचे १६ व १७ वर्षांचे दोन अल्पवयीन मित्रही हजर होते. मुलीला धमकी देऊन या चौघांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वैभवनेच तिला घरी सोडूनही दिले.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीने अजनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून पीएसआय एस. आर. सोमनकर यांनी आरोपींच्या विरोधात अपहरण, बलात्कार व पाॅक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.
...
‘ती’ कान पकडून म्हणत होती... सॉरी
गुरुवारी झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे पीडिता प्रचंड घाबरलेली होती. घाबरलेल्या अवस्थेत पाहून आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने प्रकार कथन केला. यानंतर शुक्रवारी सायंकाळी आईने तिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी नेले. तिथे असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याजवळ काही सांगण्यापूर्वीच ‘सॉरी..सॉरी’ म्हणत कान पकडून ती ओक्साबोक्सी रडायला लागली. बराच वेळ तिच्या तोंडून शब्दही निघत नव्हते. अखेर पोलिसांनी धीर दिला, विश्वासात घेतल्यावर तिने माहिती सांगितली.
...