Nagpur Rain: जिल्हाधिकारी अन् मनपा आयुक्त घटनास्थळी; विविध भागात मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 10:40 AM2023-09-23T10:40:47+5:302023-09-23T11:47:35+5:30

एनडीआरएफची आणि एसडीआरएफच्या चमुही बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत.

Collector and Municipal Commissioner at the scene; Helpline number issued for help in various areas | Nagpur Rain: जिल्हाधिकारी अन् मनपा आयुक्त घटनास्थळी; विविध भागात मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी

Nagpur Rain: जिल्हाधिकारी अन् मनपा आयुक्त घटनास्थळी; विविध भागात मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी

googlenewsNext

नागपूर : शुक्रवारी रात्री शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचल्याने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घटास्थळांना भेटी देवून मदत कार्य आरंभिले आहे. एनडीआरएफची आणि एसडीआरएफच्या चमुही बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. मनपातर्फे तत्काळ मदतीसाठी हेल्प लाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

नागपुरात काल  शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अवघ्या ४ तासात १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या परिस्थितीची माहिती फडणवीस यांना दिली. त्यानुसार फडणवीस यांनी तातडीने नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्य करण्याचे आदेश दिले. 

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या आहेत. तातडीने बचाव कार्य सुरू करण्यासाठी शहरात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचा (एनडीआरएफ) एक आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे  (एसडीआरएफ) दोन चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मनपाकडून हेल्पलाईन  नंबर जारी करण्यात आले आहे. 

नागपूर महानगरपालिका आपात्कालीन मदत क्रमांक-

आपात्कालीन नियंत्रण कक्ष (मुख्यालय) 0712-2551866/7030972200

लक्ष्मीनगर झोन क्र.1 0712-2245833

धरमपेठ झोन क्र.2 
0712-2565589/2567056

हनुमान नगर झोन क्र.3
0712-2755589

धंतोली झोन क्र.4
0712-2958401

नेहरू नगर झोन क्र.5 
0712-2270090/2702126

गांधीबाग झोन क्र.6

0712-2735599

सतरंजीपुरा झोन क्र.7
7030577650

लकडगंज झोन क्र.8
0712-2737599/2739020

आशीनगर झोन क्र.9

0712-2653476

मंगळवारी झोन क्र.10

0712-2595599/2590605 / 2536903

Web Title: Collector and Municipal Commissioner at the scene; Helpline number issued for help in various areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.