‘कलेक्टर’ पोलिसांच्या कृत्याचा पर्दापाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:11+5:302021-03-04T04:14:11+5:30
नागपूर : गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून जुगार अड्ड्यांना संरक्षण देण्याच्या बदल्यात वसुली करण्यात आल्याचा प्रकार उजेडात ...
नागपूर : गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून जुगार अड्ड्यांना संरक्षण देण्याच्या बदल्यात वसुली करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. कोराडीतील कुख्यात नवाब खान याच्या जुगार अड्ड्यावर छातलेल्या छाप्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर बुधवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखा आणि ठाण्यात तैनात असलेल्या ‘कलेक्टर’ कर्मचाऱ्यांना चांगले फैलावर घेतले. आता कारवाईच्या भीतीने हे सारेजण धास्तावले आहेत. फोन-५ चे डीसीपी नीलोत्पल यांच्या सूचनेवरून मंगळवारी कोराडी येथे चालविण्यात येत असलेल्या नवाब खानच्या अड्ड्यावर धाड घालून १२ जुगाऱ्यांना पकडण्यात आले होते. नवाब हा ३१ मार्च २०१५ च्या कारागृहातून फरार होण्याच्या घटनेत सहभागी होता. त्याने कारागृहात बंद असलेल्या कुख्यात राजा गौस, बिसन सिंह उइके, सत्येंद्र गुप्ता, प्रेम खत्री ऊर्फ नेपाळी आणि गोलू ठाकूर यांना पळून जाण्यात मदत केली होती. नवाब काही दिवसांपासून कोराडी आणि मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुगार चालवित आहे. त्याचे एक डझनावर पंटर निगराणीसाठी तैनात होते. कोणताही धोका दिसताच ते मानकापूर ते कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जात असत. गुन्हे शाखा आणि मानकापूर पोलिसांना या अड्ड्याची माहिती होती. मात्र वसुली करून ते परत येत असत. काही दिवसांपूर्वी डीसीपी नीलोत्पल यांना याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मंगळवारी त्यांनी आपल्या दळातील कर्मचाऱ्यांसह यशोधरा आणि कपिलनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार केली. त्यांना परिसराची माहिती देऊन असा काही सापळा रचला की जुगाऱ्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे नवाबसह १२ जुगारी पकडण्यात यश आले. १ लाख ८ हजार रुपये रोख आणि ४ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.सूत्रांच्या माहितीनुसार, ही धाड घातली जात असताना गुन्हे शाखा आणि ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी संरक्षण पुरविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डीसीपी यांना मिळाली. सत्यता पटल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी सायंकाळी संशयित कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कडक कारवाई करण्याचे संकेतही दिले. काही कर्मचारी दुसऱ्यांदा गुन्हे शाखेत आले असून ते कारवाईएवजी वसुलीत गुंतलेले असतात, अशी माहिती आहे. मात्र नीलोत्पल यांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उजेडात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने ‘मिस्टर क्लीन’ म्हणून ओळखले जातात. पट्टीचे गुन्हेगारही त्यांच्यापुढे नरमतात. या प्रकरणात खुद्द पोलीस कर्मचारीच सहभागी असल्याचे प्रकाशात आल्याने गंभीर मानले जात आहे. या अड्ड्यावर मिळालेल्या डायरीमध्ये १५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नावे असून नवाब त्यांना दरमहा ठराविक रक्कम देत असे. फेब्रुवारी महिन्यात एक लाखापेक्षा अधिक रक्कम दिल्याची नोंद आहे.
...
बॉक्स
शांतीनगर पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी मुख्यालयात
आरोपी विजय ऊर्फ विजू वागधरे याच्या हत्याप्रकरणी ढिलाई करणाऱ्या पाचपावली ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांची बदली बुधवारी मुख्यालयात करण्यात आली. ७ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेदरम्यान विजूची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी त्याने हल्ला करून विद्यार्थ्यासह दोघांना जखमी केले होते. याची माहिती मिळाल्यावरही पोलिसांनी विजूला अटक करण्यात तत्परता दाखवली नव्हती. तो परिसरात गोंधळ घालत राहिला. यामुळे संतप्त होऊन विरोधकांनी त्याचा खून केला. पोलीस आयुक्तांनी केलेल्या चौकशीत पोलिसांची कुचराई पुढे आली. त्यामुळे शांतिनगरचे हवलदार गणेश घुग्गलकर, दत्ता घुगल, अश्विन बोरकर, वसीम देसाई विवेक कावडकर यांचे मुख्यालयात स्थानांतरण करण्यात आले.
...