जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विकासकामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:16+5:302021-09-24T04:10:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : तालुक्यातील खैरी ग्रामपंचायत येथे भेट देऊन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी विकासकामे, तसेच काेराेना काळात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यातील खैरी ग्रामपंचायत येथे भेट देऊन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी विकासकामे, तसेच काेराेना काळात ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. खैरी येथील स्वस्त धान्य दुकानाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. साेबतच पीक पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना ई-पीक नाेंदणीचे आवाहन केले.
खैरी येथील सरपंच माेरेश्वर कापसे यांनी जिल्हाधिकारी विमला आर. यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अक्षय पाेयाम, खंडविकास अधिकारी अशुंजा गराटे, नायब तहसीलदार राजेंद्र माळी, विस्तार अधिकारी मनीष दिघडे, अमाेल पाेळ, युवराज चाैधरी, उपसरपंच वीणा रघटाटे, ग्रा.पं. सदस्य नथ्थू ठाकरे, दिलीप ठाकरे, हृदय साेनवणे, दिनेश मानकर, विजया शिंदे, प्रीती मानकर, सुजाता डाेंगरे, ग्रामविकास अधिकारी नीलकंठ देवगडे आदींची उपस्थिती हाेती. ग्रामपंचायत पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आराेग्यसेविका यांच्यासह गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. खैरी येथील साैंदर्यीकरण, तसेच गावात ३२ सीसीटीव्ही व डिजिटल स्क्रीन लावल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे काैतुक केले.
दरम्यान, त्यांनी शेतातील पिकांची पाहणी केली. ई-पीक ॲपद्वारे नाेंदणी करणार नाही, अशा शेतकऱ्यांची पिकांची नाेंद सातबारावर हाेणार नाही. त्यामुळे पीक कर्ज, पीक विमा, शेती खरेदी-विक्री करणे, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती, अनुदान वाप, न्यायालयीन प्रकरणात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपद्वारे पीक नाेंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.