नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेवरून कॉलेज संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 11:49 PM2021-03-05T23:49:36+5:302021-03-05T23:51:06+5:30
Nagpur University exams, College confused विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात केलेल्या घोषणेमुळे कॉलेज प्रशासन संभ्रमात आहे. कुठल्या विषयाची व किती अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यायची आहे, याबाबत ते साशंक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात केलेल्या घोषणेमुळे कॉलेज प्रशासन संभ्रमात आहे. कुठल्या विषयाची व किती अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यायची आहे, याबाबत ते साशंक आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी एक अधिसूचना जारी केली आहे. यात परीक्षेबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. कॉलेजचे म्हणणे आहे की कुठल्या विषयाच्या व किती अभ्यासक्रमावर परीक्षा घेतल्या जातील याबाबत त्यात स्पष्ट केले नाही. अधिसूचनेत केवळ परीक्षेची माहिती दिली आहे. त्यात सांगण्यात आले आहे किती टप्प्यात कोणती परीक्षा होईल. कॉलेजलासुद्धा परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी दिली आहे. सर्वात मोठा संभ्रम १०० विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजनावरून झाला आहे. लोकमत सोबत बोलताना कॉलेजचे प्राचार्य म्हणाले की परीक्षेच्या आयोजनापूर्वी परीक्षा विभाग प्राचार्यांची बैठक बोलाविते. यावर्षी असे झाले नाही. सरळ परीक्षेची घोषणा करण्यात आली.
बैठक बोलाविणार
यासंदर्भात डॉ. साबळे म्हणाले की अधिसूचनेत परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहे. परीक्षेवरून मला वाटते कुठलाही संभ्रम नाही. तरीही अडचणी येत असेल तर त्या सोडविण्यात येतील. यासाठी ६ व ७ मार्चला कॉलेजच्या प्राचार्यांची बैठक होईल. यात त्यांना सर्व परिस्थितीशी अवगत केले जाईल.