संपाचा फटका

By admin | Published: September 3, 2015 02:49 AM2015-09-03T02:49:20+5:302015-09-03T02:49:20+5:30

केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी धोरण, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी, श्रम कायदा , बेकायदेशीर ठेकेदारीवर प्रतिबंध घालण्यात यावा.

Collision shot | संपाचा फटका

संपाचा फटका

Next

शासकीय कामे खोळंबली : ५० हजारांवर कर्मचाऱ्यांचा सहभाग
नागपूर : केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी धोरण, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी, श्रम कायदा , बेकायदेशीर ठेकेदारीवर प्रतिबंध घालण्यात यावा. आदी मागण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, देशातील ११ केंद्रीय कामगार संघटना, उद्योग, सेवा आस्थापनावरील कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र महासंघाने केलेल्या आवाहनानुसार बुधवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील ५० हजारावर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते, असा दावा विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांना विरोध करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील कामगारांनी पुकारलेल्या एक दिवसीय संपाचा फटका उपराजधानीला बसला. कामगार संघटना कृती समिती नागपूर यांच्या नेतृत्वात कस्तुरचंद पार्क येथे जाहीर सभा घेण्यात आली.
आयुर्विमा कर्मचारी
अ.भा. विमा कर्मचारी असोसिएशनच्या नेतृत्वात भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रमुख संघटनांनी देशव्यापी संप १०० टक्के यशस्वी केला. संपात सहभागी झालेल्या आयुर्विमा कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयात शुकशुकाट होता. याचा फटका विमाधारकांना मोठ्या प्रमाणावर बसला. कर्मचाऱ्यांनी आयुर्विमा मुख्यालयासमोर केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रमेश पाटणे, टी.के. चक्रवर्ती, धनराज डोंगरे, अनिल ढोकपांडे यांनी मोदी सरकारच्या धोरणाविरुद्ध सडकून टीका केली. सभेला नरेश अडचुले, अभय पाटणे, वाय.आर. राव, राजकुमार फुलबांधे, शिवा निमजे, राजेश विश्वकर्मा, नेहा मोटे, सुधाकर कांडलकर, अभय पांडे, अशोक रामटेककर, मिलिंद कुमार आदी उपस्थित होते.
राज्य सरकारी कर्मचारी
मध्यवर्ती संघटना
केंद्रीय ट्रेड युनियनने पुकारलेल्या संपात नागपुरातील राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन एकजुटीचे प्रदर्शन करून १०० टक्के संप यशस्वी केला. जिल्ह्यातील आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, वनभवन, जुने सचिवालय, पाटबंधारे विभाग, मुद्रणालय, फॉरेन्सिक लेबॉरेटरी, धर्मादाय आयुक्त कार्यालय, टेक्निकल हायस्कूल, कृषी विभाग, शिक्षण विभाग, भूमी अभिलेख, आरटीओ आदी विभागाच्या कार्यालयात शुकशुकाट होता. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष चंद्रहास चुटे, अशोक दगडे, नारायण समर्थ, बुधाजी सूरकर, नाना कडवे, ज्ञानेश्वर महल्ले, प्रकाश डोंगरे, नरेश मोरे, भीमराव भुसारी, शैलजा जोग, प्रशांत शहाकार यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी संघटना
देशव्यापी संपात जिल्ह्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने बुधवारी शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. संप यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र सुरशे, केशव शास्त्री, प्रमोद कावळे, नितीन सोमकुवर, मोरेश्वर पवार, भीमराव भुसारी, सत्यवान गणवीर, नीरज शर्मा, धर्मपाल बागडे यांच्या नेतृत्वात संप १०० टक्के यशस्वी झाला.
महाराष्ट्र विक्रीकर
कर्मचारी संघटना
संघटनेच्या नागपूर विभागातील सदस्यांनी विक्रीकर कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरण व नवीन कामगार कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मोर्चा काढून कस्तूरचंद पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत सहभाग घेतला. सभेचे संचालन किरण दहीकर यांनी केले. मोर्चाचे नेतृत्व अरुण भालेराव, राजेश पारेकर, अनिल पोटे, अशोक गौर, सुरेश बारती, मंगेश गंगाखेडकर, लुमाकांत बावणे, नीलेश देशमुख, अंजली खांडवे, गिरीश चुडे, सुभाष जुमडकर, मंजू जैन, धर्मराज राऊत, धीरज मौंदेकर यांनी केले.
राज्य परिवहन महामंडळ
अ‍ॅप्रेन्टिस कृती समिती

अ‍ॅप्रेन्टिसशिप काळात किमान वेतनावर आधारित १५ हजार रुपये मानधन मिळावे, अ‍ॅप्रेन्टिसशिप करणाऱ्यांना स्थायी नोकरीची संधी देण्यात यावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अ‍ॅप्रेन्टिस कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. यात संघटनेचे कुणाल सावंत, पीयूष खापेकर, उस्मान खान, राहुल ठाकरे, राहुल अस्वार, कुणाल यादव, सूरज ब्राम्हणे, सचिन कुंबारे, हर्षल गोमकर, पूरब लव्हारे, अभय पिंपळगावकर, सपना इंदूरकर, संध्या मेहरा, अश्विनी शेंडे सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ
अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, ३५ महिन्याची थकबाकी अदा करा, रिक्त पदे तत्काळ भरा, खाजगीकरण रद्द करा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जि.प. कर्मचारी महासंघ, नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जि.प. कर्मचारी युनियन या तीनही संघटनांनी देशव्यापी संपात सहभागी होऊन द्वारसभा घेतली. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी जि.प.चे ५०० कर्मचारी उपस्थित होते. यात अशोक थूल, वासुदेव वाकोडीकर, लक्ष्मण इखनकर, गोपीचंद कातुरे, संजय तांबडे, अरविंद मदन, नंदा क्षीरसागर, शुभदा बक्षी, मंगला मेश्राम, गौतम माटे, अशोक कुर्वे, माया वडे, गजानन गल्हाट, विनोद वातकर, हरीश माटे, प्रशांत वीरखरे, प्रमोद जिचकार, देवीदास सालवनकर, शैलेष तभाने, संजय कांबळे, विनोद बाराहाते आदी उपस्थित होते.
आॅल इंडिया डेमोक्रॅटिक
स्टुडंट आॅर्गनायझेशन

संघटनेच्या वतीने सरकारच्या धोरणाविरुद्ध तीव्र निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व विजेंद्र राजपूत, आशिष लोखंडे, माधुरी निकुरे, योगेंद्र दास यांनी केले. आंदोलनात विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व युवकांनी सहभाग नोंदविला.
केंद्रीय कपास
अनुसंधान संस्था

केंद्रीय श्रमिक संघटनांच्या आव्हानावर केंद्रीय कपास अनुसंधान संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप पुकारून कामगार कार्यालयाच्या गेटपुढे सरकार विरोधी धोरणाचा नारे निदर्शने करून निषेध केला. या निदर्शनात पृथ्वीराज चौधरी, अनिल बाराहाते, मोरेश्वर वागदे, दशरथ राऊत, क्रिष्णा इंगळे, इंदिरा पारेकर, कमला गोटेकर, चंदन ताकसांडे, बंडू वानखेडे आदी उपस्थित होते.
वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी
नागपुरातील वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींनी संपात १०० टक्के सहभाग नोंदविला. सिटूच्या नेतृत्वात झालेल्या रॅलीत मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी झाले. होते. संघटनेतर्फे २००० पत्रके वाटण्यात आली. यात प्रवीण माणुसमारे, चंद्रशेखर मालवीय, राजेश चौहान, आशिष मांगलेकर, संजय काळकर, प्रदीप सुकमणी, अनिल ढेंगे, सूरज पिंपरीकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Collision shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.