सी-२० साठी उद्या रंगीत तालीम; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; २० मार्च रोजी उद्घाटन

By कमलेश वानखेडे | Published: March 17, 2023 08:24 PM2023-03-17T20:24:22+5:302023-03-17T20:25:03+5:30

Nagpur News सी-२० परिषदेच्या प्रतिनिधींचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत व नियोजित ठिकाणी प्रस्थान होण्याच्या दृष्टीने चोख व्यवस्था पार पाडण्यासाठी शनिवारी, १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रंगीत तालीम घेतली जाणार आहे.

Color rehearsal for C-20 today; Divisional Commissioner reviewed; Inauguration on 20 March | सी-२० साठी उद्या रंगीत तालीम; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; २० मार्च रोजी उद्घाटन

सी-२० साठी उद्या रंगीत तालीम; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; २० मार्च रोजी उद्घाटन

googlenewsNext

नागपूर : सी-२० परिषदेच्या प्रतिनिधींचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत व नियोजित ठिकाणी प्रस्थान होण्याच्या दृष्टीने चोख व्यवस्था पार पाडण्यासाठी शनिवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रंगीत तालीम घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात ही रंगीत तालीम पार पडणार आहे.

२० ते २२ मार्च दरम्यान होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आयोजनाबाबत प्रशासनाच्या विविध विभागांची शुक्रवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्ण बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

१९ मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी व भारतीय प्रतिनिधींचे या परिषदेसाठी शहरात आगमन होणार आहे. २० मार्च रोजी दुपारी रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सी-२० परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सी-२० साठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यासह जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय याबाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.

Web Title: Color rehearsal for C-20 today; Divisional Commissioner reviewed; Inauguration on 20 March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.