नागपुरातील सीताबर्डीत रंगली रेव्ह पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:13 PM2019-12-31T23:13:45+5:302019-12-31T23:16:06+5:30

सीताबर्डी येथील राहुल बाजार सोसायटीतल्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडूनही दिले.

Colored rave party at Sitabardi in Nagpur | नागपुरातील सीताबर्डीत रंगली रेव्ह पार्टी

नागपुरातील सीताबर्डीत रंगली रेव्ह पार्टी

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयितांना ताब्यात घेतले व सोडले : पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी येथील राहुल बाजार सोसायटीतल्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडूनही दिले. त्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रेव्ह पार्टीमध्ये तरुण-तरुणी व काही समलैंगिक व्यक्ती दारूच्या नशेत धिंगाणा घालत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस फ्लॅटमध्ये पोहचले असता त्यांना दारूच्या बाटल्या व इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. रेव्ह पार्टीतील सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. परिसरातील नागरिकही तेथे पोहचले. त्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, पोलिसांनी त्यांना घरी जाण्याची सूचना केली. त्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यांनी तक्रारीची प्रत देण्याची मागणी केली. त्यामुळे सुरुवातीला पोलीस कर्मचारी रागात आले होते. परंतु, दबाव निर्माण झाल्याने त्यांनी तक्रारीची प्रत नागरिकांना दिली. त्यानंतर रेव्ह पार्टीतील सर्वांची सुटका करण्यात आली. परिणामी, नागरिकांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

महिलांसोबत असभ्य वर्तन
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महिलांसोबत असभ्य वर्तन केले. महिला पहाटेपर्यंत पोलीस ठाण्यात थांबल्या होत्या. पोलिसांनी त्यांना धाक दाखवून घरी जाण्यास सांगितले. तसेच, नागरिकांच्या बयानातील महत्त्वपूर्ण मुद्दे वगळले.

छायाचित्रे डीलिट केली
पोलिसांनी रेव्ह पार्टीचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग डीलिट केली. त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ‘तुम्हाला जे करायचे आहे ते करा’ असे उद्धट उत्तर दिले असे एका नागरिकाने सांगितले.

Web Title: Colored rave party at Sitabardi in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.