कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’
By admin | Published: September 22, 2015 04:32 AM2015-09-22T04:32:49+5:302015-09-22T04:32:49+5:30
यंदा गणेशोत्सवात आपला बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता
नागपूर : यंदा गणेशोत्सवात आपला बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता भगवान श्री गणेश बुद्धीची देवता आहे. मोठ्या उत्साहाने बुद्धीच्या या देवतेची विधिपूर्वक पूजा केली जाते. नैवेद्य, आरती आणि पुष्पहार घालून प्रसाद अर्पण केला जातो. गणेशाला प्रसन्न करून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी भक्त गणेशाची उपासना, आराधना करतात. गणेशाची आपल्यावर कृपा कायम राहावी म्हणून कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपला बाप्पा उत्सवात ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नैवेद्य, हार, पूजा यांचे अनोखे मिश्रण असणार आहे.
संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलर्स वाहिनीवर कौटुंबिक आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी मालिका ‘बालिका वधू’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेला सर्वाधिक लांब मालिका असण्याचा सन्मान लाभला आहे.
सध्या ही मालिका दोन हजाराव्या भागाकडे जात आहे. आपल्या समाजात होणाऱ्या बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. लहान मुलीपासून सशक्त आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी लढवय्यी आनंदीचा जीवनप्रवास आणि अन्य सामाजिक घटनाक्रमाच्या कारणाने ही मालिका प्रत्येक भागात प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करते आहे.
आनंदीची अपहरण करण्यात आलेली मुलगी तिला कशी मिळेल? ती आनंदीला आपली आई म्हणून स्वीकारेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे दोन हजाराव्या भागात मिळणार आहेत. हा समारंभ मंगळवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता गीता मंदिर, कॉटन मार्केट, सुभाष रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठीच खुला आहे. कार्यक्रमात कलर्स वाहिनीवरील मालिका ‘बालिका वधू’वर आधारित काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या सखीला पुरस्कारही देण्यात येणार आहे. याशिवाय वन मिनिट गेम शो ‘होम मिनिस्टर’ होईल. ‘देऊ या तिला मान’ विषयावर भाषण स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
या कार्यक्रमात सहभागी सर्व सखींना पूजेची थाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे.
यासोबतच एका भाग्यशाली सखीला पैठणी भेट म्हणून देण्यात येईल.
आपला बाप्पा मोदक स्पर्धेत विविध रेसिपीसह मोदक घरून तयार करून आणायचे आहेत.
आपला बाप्पा पुष्पहार स्पर्धेसाठी लागणारे साहित्य घरूनच घेऊन यावे लागेल. निर्धारित वेळेत पुष्पहार तयार करणे बंधनकारक आहे.
आपला बाप्पा गणेश रेखाटन स्पर्धेत लागणाऱ्या सर्व साहित्याचा उपयोग करावा लागेल. जसे, फूल, बिल्वपत्र, पान, सुपारी, रांगोळी आदी.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सखी कार्यक्रम स्थळीही नोंदणी करू शकणार आहेत.
सखींना मिळणार पैठणी जिंकण्याची संधी
समारोहात ‘वन मिनिट गेम शो’मध्ये ‘होम मिनिस्टर’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सखींना भरपूर पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘होम मिनिस्टर’च्या पुरस्कारांमध्ये पैठणीचे विशेष आकर्षण राहणार आहे. या स्पर्धेतील प्रश्नोत्तरे मजेदार राहणार आहेत. या प्रश्नांची सर्वाधिक योग्य उत्तरे देणाऱ्या सखीला ही पैठणी मिळणार आहे.