चला, मुलांनो शाळेत चला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:12 AM2021-08-13T04:12:07+5:302021-08-13T04:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोविडमुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण ...

Come on, kids, go to school! | चला, मुलांनो शाळेत चला!

चला, मुलांनो शाळेत चला!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोविडमुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सर्वत्र धडकल्या आहेत. पालकही आपल्या पाल्याबाबत ‘संमती पत्र’ शाळेकडे सुपूर्द करीत असून, शाळांचेही प्रस्ताव पालिकेकडे जात आहेत. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीनंतर आणि कोरोना आटोक्यात येत असल्याचे आशादायी चित्र दिसून आल्यानंतर आता ‘चला, मुलांनो शाळेत चला’ अशी हाक दिली जात असून, ग्रामीण भागातील शाळांपाठोपाठ शहरातीलही शाळा लवकरच सुरू होतील, असे संकेत आहेत.

उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागात वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या एकूण २९ शाळा आहेत. यापैकी तब्बल २१ शाळा सद्यस्थितीत सुरू झालेल्या असून, पालक-पाल्यांचा उत्तम प्रतिसादसुद्धा मिळत आहे. १५ जुलैपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी शहरातील शाळांना अद्याप हिरवी झेंडी मिळाली नव्हती. आता उमरेड शहरसुद्धा कोरोनामुक्त झाल्याने स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे. उमरेड शहरात इयत्ता ८ ते १२ च्या एकूण १५ शाळा असून, अंदाजे ६,५०० इतकी पटसंख्या आहे.

जीवन विकास विद्यालय, जीवन विकास वनिता विद्यालय, अशोक विद्यालय, अशोक कन्या विद्यालय, न्यू आयडियल हायस्कूल, न्यू आयडियल गर्ल्स हायस्कूल, पब्लिक हायस्कूल, मधुबन काॅन्व्हेंट, स्व. देवरावजी इटनकर पब्लिक हायस्कूल, संस्कार विद्यासागर, ओम विद्यानिकेतन, पुष्पक महाविद्यालय आणि नूतन आदर्श महाविद्यालय या शाळा-महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे.

....

पालिकेच्या निर्णयाकडे लक्ष

शुक्रवारी (दि. १३) रोजी उमरेड पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास शाळा सुरू होतील आणि त्यानंतर ज्या १३ शाळांनी प्रस्ताव पाठविला त्या शाळांना हिरवी झेंडी मिळेल, असे समजते. शहरी विभागातील शाळा सुरू करण्याबाबतचा आदेश नुकताच निघाला असल्याने साधारणत: १७ ऑगस्टपासून शहरातील शाळा सुरू हाेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

....

आता ऑनलाईन शिक्षणाचा आम्हाला जाम कंटाळा आला आहे. आम्ही बोर झालो. वर्गात बाकांवर बसून शिक्षण ग्रहण करण्याचा आनंद हटके असतो. शिक्षकांची सर्वांवर बेरकी नजर असते. ऑनलाईनमध्ये अभ्यासच होत नाही. आता शाळा लवकर सुरू होणे गरजेचे आहे.

- तनिष्क बासाेडे (विद्यार्थी)

जीवन विकास विद्यालय, उमरेड

Web Title: Come on, kids, go to school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.