चला नागपूरकरांनो, साजरा करूया आज ‘लोकमत’चा ५१ वा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 07:00 AM2022-12-15T07:00:00+5:302022-12-15T07:00:11+5:30

Nagpur News ‘लोकमत’ ५० वर्षांची यशस्वी आणि गौरवपूर्ण वाटचाल पूर्ण करून सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण करीत आहे. आज, १५ डिसेंबर ‘लोकमत’चा ५१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात लोकमत चौकात नागपूरकरांच्या साक्षीने साजरा केला जाईल.

Come on Nagpurians, let's celebrate the 51st anniversary of 'Lokmat' today | चला नागपूरकरांनो, साजरा करूया आज ‘लोकमत’चा ५१ वा वर्धापन दिन

चला नागपूरकरांनो, साजरा करूया आज ‘लोकमत’चा ५१ वा वर्धापन दिन

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत चौकात साजरा होणार सुवर्ण वाटचालीचा उत्सव विविध समस्या- प्रश्न मांडा, उपाय सुचवा अन् परिवर्तनाचा दिवा पेटवा


नागपूर : ‘लोकमत’ ५० वर्षांची यशस्वी आणि गौरवपूर्ण वाटचाल पूर्ण करून सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण करीत आहे. आज, १५ डिसेंबर ‘लोकमत’चा ५१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात लोकमत चौकात नागपूरकरांच्या साक्षीने साजरा केला जाईल. यानिमित्त ‘लोकमत’ भवनासमोर सायंकाळी ५ वाजता ५१ दीप प्रज्वलित केले जातील. समाजातील जागरूक घटक म्हणून हा दीप प्रज्वलित करण्याची संधी ‘लोकमत’ आपल्याला देत आहे. यानंतर ५१ वर्षांचा केकदेखील कापला जाईल.

५० वर्षांच्या या अहर्निश प्रवासात अनेक निखारे बांधून ‘लोकमत’ वंचित-पीडित-शोषितांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले. प्रस्थापित वर्तुळाला छेद देत वृत्तपत्र नावाची संकल्पना समाजाभिमुख केली. अनेक दिव्य पार पाडत आणि खाचखळग्यांतून प्रवास करीत ‘लोकमत’ने महाराष्ट्रव्यापी, देशव्यापी झाला. काळ कधी वेगाने तर कधी संथपणे मागे पडत गेला. आता पुढच्या नव्या प्रवासाला अखंड सुरुवात झाली आहे. या नव्या प्रवासाची सिद्धता करताना गेल्या ५० वर्षांतील पट आजही डोळ्यांपुढून झरझर सरकतो आहे. नेमका हाच धागा पकडून ‘लोकमत’ आज ५१ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. हेपण यामागील संकल्पना काहीशी वेगळी आहे.

युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, नागरी समस्या असे अनेक प्रश्न व समस्या आहेत. समाजात वावरताना तुम्हाला कोणती समस्या किंवा प्रश्न महत्त्वाचा वाटतो व त्यावर उपाय योजायला हवेत, याची माहिती गुरुवारी दुपारी ४.३० पर्यंत लोकमत भवन, लोकमत चौक, वर्धा रोड, नागपूर येथे जमा करा.

तुमचे प्रश्न व उपायांची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार

पहिल्या ५१ उपाय सूचविणाऱ्या व्यक्तींना ‘लोकमत’ वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात दीप प्रज्वलित करण्याची संधी दिली जाईल. विशेष म्हणजे आपण लक्ष वेधलेला प्रश्न व त्यावरील उपायांची माहिती एकत्र करून अधिवेशन काळात ‘लोकमत’च्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे सोपविली जाईल. तर, चला पुढाकार घ्या. भेडसावणारे प्रश्न व त्यावरील उपाय लिहून लोकमत भवनला पोहोचा आणि परिवर्तनाचा दिवा पेटवा.

Web Title: Come on Nagpurians, let's celebrate the 51st anniversary of 'Lokmat' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.