संविधान टिकविण्यासाठी एकत्र या; ‘दक्षिणायान’चे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:16 AM2018-01-31T04:16:49+5:302018-01-31T04:17:08+5:30

देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे.

 Come together to save the constitution; Appeal of 'Dakshinaayan' | संविधान टिकविण्यासाठी एकत्र या; ‘दक्षिणायान’चे आवाहन

संविधान टिकविण्यासाठी एकत्र या; ‘दक्षिणायान’चे आवाहन

googlenewsNext

नागपूर : देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देत दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.
सत्य, अहिंसा व संविधान सुरक्षेचा संदेश देण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी व दक्षिणायनचे डॉ. गणेश देवी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मौन पदयात्रेत देशभरातील नामवंत साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये कुमार शिराळकर, कुमार केतकर, रावसाहेब कसबे, मेधा पाटकर, मेधा पानसरे, उल्का महाजन, लीलाताई चितळे, डॉ. प्रज्ञा दया पवार, राजन अन्वर , विद्या बाळ, शारदा साठे, नागेश चौधरी, धनाजी गुरव, राजन खान, डॉ. क्रिष्णा कांबळे, अमिताभ पावडे, कवी ज्ञानेश वाकुडकर, सुनैना आझाद, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, आसाराम लोमटे, प्रफुल्ल शिलेदार, रजिया पटेल, हमीद दाभोळकर, वीरा राठोड,अभय कांता, शमसुद्दीन तांबोळी, जमाते इस्लामीचे डॉ. अनवर सिद्दीकी, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
सुरुवातीला दीक्षाभूमीवर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत पदयात्रा सुरू करण्यात आली. हातात देशातील महापुरुषांचे फोटोसह अनेक प्रकारचे संदेश देणारे फलक घेऊन व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांना नमन करण्यात आले.

Web Title:  Come together to save the constitution; Appeal of 'Dakshinaayan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.