उत्साहात रंगला श्रावण सोहळा सोबत कॉमेडीचा मेळा
By admin | Published: September 2, 2015 04:43 AM2015-09-02T04:43:19+5:302015-09-02T04:43:19+5:30
कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘श्रावण सोहळा सोबत कॉमेडीचा मेळा’ कुसुमताई वानखेडे सभागृहात रविवारी
नागपूर: कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘श्रावण सोहळा सोबत कॉमेडीचा मेळा’ कुसुमताई वानखेडे सभागृहात रविवारी रंगला. यात भरपूर मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रावणाचा आल्हाद होता.
ऊन-पावसाच्या खेळाप्रमाणे स्पर्धांची चुरस होती, तर कॉमेडी मेळ्यातून सर्वत्र आनंद बहरला होता. या सोहळ्यात सहभागी सखींकडून एकेक क्षण टिपला जात होता. वैविध्यपूर्ण आयोजन आणि सखींची दिलखुलास दाद याचे वैशिष्ट्य ठरले. उत्तम आयोजनाची या अनुपम सोहळ्याला किनार लागली होती. मेडिमिक्स आणि बिरला सन लाईफ इन्शुरन्स हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलर्स चॅनलमध्ये ५ सप्टेंबरपासून दर शनिवारी रात्री १० वाजता सुरू होणाऱ्या ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ या विनोदी कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. या ‘शो’ची वैशिष्ट्ये म्हणजे यात कॉमेडियनच्या पाच जोड्या तयार करण्यात आल्या. प्रत्येक जोडीमध्ये दोन कलावंत म्हणजे दहा कलावंत आपल्या अभूतपूर्व विनोदी शैलीने समोर बसलेल्या रसिकांना पोटधरून हसविणार आहेत. हास्य आणि कलाविष्काराने सादर करण्यात आलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना भरपूर आनंद देणारा ठरणार आहे.
‘श्रावण सोहळा सोबत कॉमेडीचा मेळा’चा आरंभ ‘इनोव्हेटिव्ह मेडिमिक्स हर्बल फॅशन शो’ने झाला. या स्पर्धेत श्रावणात मिळणारी फळे, भाज्या, फुले यांचा साज करीत सखी रॅम्पवर चालल्या. यात प्रथम पुरस्कार प्राप्त सखी शुभांगी नानवटकर यांना ‘मेडिमिक्स क्वीन-२०१५’ पुरस्कार, द्वितीय विजेत्या शुभांगी लांजेवार यांना ‘मेडिमिक्स फ्रेश फेस’ तर तृतीय विजेत्या लीना पाटील यांना ‘मेडिमिक्स हेल्दी स्किन’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात ‘बिरला सनलाईफ इन्शुरन्स’च्या वतीने बिरला सनलाईफच्या विविध इन्शुरन्सच्या योजनांची माहिती देण्यात आली. मेळाव्यात स्टॉल लावून सखींची नोंदणीही करण्यात आली. यात जमा झालेल्या अर्जातून ५० लकी ड्रॉ काढून पुरस्कारांची घोषणा केली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सखी रमल्या
४सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सखींनी उखाणे घेतले. प्रत्येक उखाण्याला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत होती. काही सखी यजमानांचे नाव घेताना लाजल्या, अडखळल्याही; मात्र ही आपली भारतीय संस्कृती, असे प्रेक्षक सखी एकमेकांना समजावून सांगत होत्या. यावेळी कलर्स चॅनलवर सादर होणाऱ्या हास्य कॉमेडी शो ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’चे कलावंत मुबीन सौदागर, प्रीतम सिंह आणि अदा खान यांनी आपली हजेरी लावली. त्यांनी सखींशी थेट संवाद साधला. कलावंतांनी आपल्या कार्यक्रमाची माहिती दिली. मेडिमिक्स इनोव्हेटिव्ह हर्बल फॅशन शोचे परीक्षण सीमा गोडबोले, कल्याणी लामधरे आणि प्रियंका बोंडनासे यांनी केले. मेहंदी आणि राखी थाळी सजवा या स्पर्धेेचे परीक्षण जय गुप्ता, प्रणाली खरबडे आणि सुनीता सावडिया यांनी केले. या उत्सावादरम्यान सौंदर्य वस्तू, कपडे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर सखींची गर्दी उसळली होती. सभागृहात राधा अतकरी यांनी काढलेली रांगोळी आकर्षण ठरले. संचालन नेहा जोशी यांनी केले. विशेष सहकार्य कुसुमताई वानखेडे सभागृहाचे मिळाले.
पंढरपूरची पालखी निघाली
४काटोल सखी मंच चमूने मराठी संस्कृतीचे प्रतीक मंगळागौर आणि पंढरपूरची पालखी यात्रा काढून संपूर्ण सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधले. याचे संयोजन काटोल सखी मंच संयोजक छाया मुसळे, जया देशमुख, राधा घोडे यांनी केले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेडिमिक्सचे टॅरिटरी सेल्स मॅनेजर हेड क्वार्टर शैलेष उमाळे, बिरला सनलाईफचे एआरएम कृष्णा पवार, नागपूर शाखा हेड दिव्य खरे आणि आरटीएम ब्रिजेश उपाध्याय उपस्थित होते.(प्रतिनिधी)