दिलासादायक! ६४ टक्के रुग्णांची कोरोनावर मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:00 AM2020-05-23T11:00:17+5:302020-05-23T11:00:48+5:30
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ११७ म्हणजे १९.२४ टक्के होती. पंधरा दिवसांत म्हणजे १५ मे रोजी टक्केवारीत वाढ होऊन ती ५५.१२ टक्क्यांवर आली, तर २० मे रोजी आणखी सुधारणा होत बरे झालेल्या रुग्णांच्या टक्केवारीचा आकडा ६४.७२ टक्के इतका झाला आहे.
देशभरात हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूची साथ नेमकी संपणार तरी कधी, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाशी झुंजतच जगावे लागणार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोविड-१९’चे बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण हे या आजाराची भीती काहीशी कमी करण्यास मदत करणारी ठरणार आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद आतापर्यंत नागपुरात झाली आहे. अकोल्यातही झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे आता सर्वच जिल्ह्यात रुग्ण दिसून येत असलेतरी त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्याही वाढत आहे. ८ मे रोजी विदर्भात ६०८ रुग्णसंख्या होती. यातील ११७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यांची टक्केवारी १९.२४ टक्के होती. ९ मे रोजी १३७ रुग्ण बरे झाले, टक्केवारी २१.६७ टक्के होती. १० मे रोजी १८५ रुग्ण बरे झाले, यांची टक्केवारी २८.२४ टक्के होती. ११ मे रोजी २०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. टक्केवारी ३०.१८ टक्के होती. १२ मे रोजी २४७ रुग्ण बरे झाले. टक्केवारी ३५.९५ टक्के होती. १३ मेपासून अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज धोरण लागू करण्यात आले. यामुळे १३ मे रोजी ३१० रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४२.९९ टक्के होती. १४ मे रोजी १४ मे ३४९ रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४६.७२ टक्के होती. १५ मेपासून नागपुरातही सुधारित डिस्चार्ज धोरण राबविणे सुरू झाले. यामुळे एकट्या मेयो रुग्णालयातून ५१ रुग्ण बरे झाले. तर विदर्भात ४३० म्हणजे ५५.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. १६ मे रोजी ही टक्केवारी वाढून ६०.३२ टक्क्यांवर पोहचली. १७ मे रोजी यात किंचित घट आली. बरे होणाºया रुग्णांची टक्केवारी ५८.८५ टक्के असताना १८ मे रोजी पुन्हा यात वाढ होऊन ती ६३.९२ टक्क्यांवर पोहचली. १९ मे रोजी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१९ वर गेली. टक्केवारीतही वाढ होऊन ६६.३४ पोहचली तर २० मे पर्यंत १,०१२ रुग्णांची नोंद झाली असताना ६५५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यांची टक्केवारी ६४.७२ टक्के होती, हे दिलासादायक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.