दिलासादायक; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:32+5:302021-05-09T04:08:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून वाढणारी रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. शहरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे ...

Comforting; Decrease in positive patients | दिलासादायक; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट

दिलासादायक; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून वाढणारी रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. शहरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मुंबईला हे यश मिळाले. मुंबईला जे जमले ते नागपूरला का जमले नाही, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला होता. परंतु ३० एप्रिल ते ६ मे या कालावधीत नागपुरातील चित्र दिलासादायक आहे. उशिरा का होईना प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. १६ ते २२ एप्रिल दरम्यान नागपुरात सर्वाधिक ३२,६४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. रुग्णांची टक्केवारी ३१.२५ पर्यंत पोहोचली होती. २३ ते २९ एप्रिल या कालावधीत ३०,००३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ३० एप्रिल ते ६ मे या कालावधीत १९,९७७ पॉझिटिव्ह आढळून आले. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मेच्या पहिल्या आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. १८.०६ टक्केवारी आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

एप्रिल महिन्यात नागपूर शहरात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हते. रुग्णांची बेडसाठी भटकंती सुरू होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे सेंट्रल कंट्रोल रूम मनपाच्या प्रशासकीय इमारतीत सुरू करण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करण्यात येत आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत ८० टक्के क्षमतेत अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. कंट्रोल रूममधून बेड अलॉट झाल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या या निर्देशामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यात आली. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ५० हजार ५९१ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ५८७२ पॉझिटिव्ह आढळले. तर आठवड्याचे पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ११.६१ टक्के होते. ते वाढत जाऊन १६ ते २२ एप्रिल दरम्यान ३१.२५ टक्केवर गेले. त्यानंतर २३ ते २९ एप्रिल या कालावधीत १,२३,४३४ चाचण्या करण्यात आल्या. यात ३०,००३ पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३० एप्रिल ते ६ मे या कालावधीत १,१०,६०२ कोरोना चाचण्यांपैकी १९,९७७ पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १८.०६ टक्केपर्यंत खाली आले.

....

कालावधी आठवड्यातील चाचण्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह टक्केवारी

२६ फेब्रुवारी ते ४ मार्च ५०५९१ ५८७२ ११.६१

५ ते ११ मार्च ४८१६१ ८७०० १८.०६

१२ ते १८ मार्च ६४९०३ १५६७५ २४.१५

१९ ते २५ मार्च ७५१९९ १८९३३ २५.१८

२६ मार्च ते १ एप्रिल ६८२५२ १५६८३ २२.९७

२ ते ८ एप्रिल ७३२५३ २०७३२ २८.३६

९ ते १५ एप्रिल ९७०५७ २७५२३ २८.३६

१६ ते २२ एप्रिल १०४४६० ३२६४६ ३१.२५

२३ ते २९ एप्रिल १२३४३४ ३०००३ २४.३१

३० एप्रिल ते ६ मे ११०६०२ १९९७७ १८.०६

Web Title: Comforting; Decrease in positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.