येणारा काळ भारताच्या आर्थिक प्रगतीचा : आर. मुकुंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 09:58 PM2018-09-15T21:58:43+5:302018-09-15T22:03:53+5:30
गेल्या काही काळापासून जगामध्ये भारताबाबत आकर्षण वाढत आहे. देशातील ‘टॅलेन्ट’मुळे उद्योगक्षेत्राची पावले इकडे वळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या कालावधीपेक्षा मागील दहा वर्षांत अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. येणारा काळ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा राहणार असून आठ वर्षात अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरचा निश्चित टप्पा गाठेल, असे मत टाटा केमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व ‘सीईओ’ रामकृष्णन मुकुंदन यांनी व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १४व्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही काळापासून जगामध्ये भारताबाबत आकर्षण वाढत आहे. देशातील ‘टॅलेन्ट’मुळे उद्योगक्षेत्राची पावले इकडे वळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या कालावधीपेक्षा मागील दहा वर्षांत अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. येणारा काळ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा राहणार असून आठ वर्षात अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरचा निश्चित टप्पा गाठेल, असे मत टाटा केमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व ‘सीईओ’ रामकृष्णन मुकुंदन यांनी व्यक्त केले. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १४व्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
‘व्हीएनआयटी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ.प्रमोद पडोळे, कुलसचिव डॉ.एस.आर.साठे व निरनिराळ्या शाखांचे अधिष्ठाता प्रामुख्याने उपस्थित होते. मी ३० वर्षांअगोदर अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली तेव्हा अनेक सहकारी विदेशात नोकरीसाठी गेले. मात्र मी देशातच राहून काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मनात शंका होती, मात्र निर्णय बरोबर ठरला. येणारा काळ भारताच्या प्रगतीचा असून उद्योगक्षेत्राची यात मौलिक भूमिका राहणार आहे. ऊर्जा, संशोधन, औद्योगिकीकरण, कृषी आणि सर्वच क्षेत्रात आपणास आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. त्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांनी देशात राहून काम करण्यावर भर दिला पाहिजे. विदेशात जाऊन चांगल्या पगाराची नोकरी कधीही मिळू शकते. मात्र भारतात राहून देशाला प्रगतीकडे नेण्याचे सारथ्य करण्याची संधी तुमच्यासमोर आहे व त्याचे समाधान वेगळेच राहणार आहे, असे आर.मुकुंदन म्हणाले. तांत्रिक शिक्षण हा शाश्वत विकासाचा कणा आहे. तांत्रिक शिक्षणाशिवाय देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे अभियंत्यांनी देशाला घडविण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. सोबतच शैक्षणिक संस्थांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून त्या दिशेने कार्य केले पाहिजे. ‘व्हीएनआयटी’ यासाठी पूर्ण प्रयत्न करेल, असा विश्वास विश्राम जामदार यांनी व्यक्त केला. अभियंता दिनाचे औचित्य साधत संस्थेच्यावतीने दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.प्रमोद पडोळे यांनी पदवीदान करण्याअगोदर ‘डायरेक्टर्स रिपोर्ट’ सादर केला. कुलसचिव डॉ.एस.आर.साठे यांनी आभार मानले.
१,१६३ विद्यार्थ्यांना पदवीदान
दीक्षान्त समारोहात एकूण १ हजार १६३ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यात ७७ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी, ३०७ विद्यार्थ्यांना ‘एमटेक’, ५५ विद्यार्थ्यांना ‘एमएसस्सी’ तर ६७२ विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी प्रदान करण्यात आली. ५७ जणांना ‘बीआर्क’ ही पदवी देण्यात आली. यंदा आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक ठरले. दरवर्षी ‘व्हीएनआयटी’तील सर्व विभागातून सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याचा सर विश्वेश्वरैया पदक देऊन सन्मान करण्यात येतो. यंदा ‘इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन’ अभियांत्रिकी विभागातील अद्देपल्ली शालिनी या विद्यार्थिनीला या पदकाने सन्मानित करण्यात आले. तर स्थापत्यशास्त्र विभागातील हरीश खैरनार या विद्यार्थ्याचा सर्वात जास्त पारितोषिकांनी सन्मान झाला. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अपूर्व कुंडलकर याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल हेमंत करकरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘रोबोटिक्स’मध्ये करणार करिअर: अद्देपल्ली शालिनी
सर विश्वेश्वरैया पदकाची मानकरी ठरलेली अद्देपल्ली शालिनी ही मूळची आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील आहे. पदवी शिक्षण झाल्यानंतरच ती बेंगळुरू येथे एका नामांकित कंपनीत रुजू झाली. येणारा काळ हा तंत्रज्ञान व ‘रोबोटिक्स’चाच आहे. त्यामुळे मला भविष्यात ‘रोबोटिक्स’मध्ये ‘करिअर’ करायचे आहे. चारही वर्ष मी नियमित अभ्यासावर भर ठेवला. यातून आत्मविश्वासदेखील वाढत गेला, असे तिने सांगितले.
विविध अभ्यासक्रमांचे टॉपर्स
शाखा नाव
मेकॅनिकल अपूर्व कुंडलकर
केमिकल श्रेयस जोशी
सिव्हिल हरीश खैरनार
सिव्हिल (एससी-एसटी महिला टॉपर) गडमल्ला अलेक्या
कॉम्प्युटर सायन्स ओंकार झाडे
कॉम्प्युटर सायन्स (द्वितीय टॉपर) इप्शिता भोसे
इलेक्ट्रिकल अर्पिता पेटकर
इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन अद्देपल्ली शालिनी
मेटालर्जिकल अॅन्ड मटेलिअल सुमेध कानडे
मायनिंग शुभम थेरे
आर्किटेक्चर पी.गौथमी
आर्किटेक्चर (द्वितीय टॉपर) बार्शा अमरेंद्र
वॉटर वर्क्स डिस्ट्रिब्युशन सिस्टम