वाणिज्य - कोरोना काळात वेकोलिचे प्रशंसनीय कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:11 AM2021-05-05T04:11:23+5:302021-05-05T04:11:23+5:30
रुग्णालयांना विजेचा पुरवठा सुरळीत सुरू रहावा व रुग्णांवरील उपचारात अडचणी येऊ नये यासाठी वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा पुरवठा ...
रुग्णालयांना विजेचा पुरवठा सुरळीत सुरू रहावा व रुग्णांवरील उपचारात अडचणी येऊ नये यासाठी वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा पुरवठा केला जात आहे़ याशिवाय कोरोनाविरुध्द लढण्यासाठीही वेकोलिच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत़ कंपनीच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी २६४ खाटा उपलब्ध आहेत़ ऑक्सिजन व रुग्णवाहिका सेवा २४ तास उपलब्ध आहे़ आतापर्यंत वेकोलिच्या रुग्णालयांमधून ९११ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत़ वेकोलि कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसह एकूण १८ हजार १७१ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे़ आरटीपीसीआर, अँटिजेन व सॅनिटायझेशन नियमित केले जात आहे़ वेकोलि कर्मचारी स्वेच्छेने प्लाझ्मा व रक्तदान करीत आहेत़ वणी क्षेत्रातील घुघ्घुस येथील राजीव रतन रुग्णालयात २८ कोरोना खाटा आहेत़ आयसोलेशनसाठी कॉलनीत व्यवस्था करण्यात आली आहे़ वरोरा रुग्णालयात १०० कोरोना खाटा देण्यात आल्या आहेत़ नागपुरातील ऑक्सिजन प्रकल्पाकरिता २ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत़