साहाय्यकारी ४७ मतदान केंद्राना आयोगाची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:17 PM2019-04-10T21:17:51+5:302019-04-10T22:47:11+5:30
लोकसभेच्या नागपूर व रामटेक मतदार संघामध्ये १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये वाढ करुन ४७ साहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगामार्फत मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या नागपूर व रामटेक मतदार संघामध्ये १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये वाढ करुन ४७ साहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगामार्फत मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
साहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून मान्यता मिळालेल्या मतदान केंद्रांमध्ये नागपूर लोकसभा मतदार संघाचे २८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मतदारसंघातील साहाय्यकारी मतदान केंद्रामध्ये ११८-अ सुभाषनगर, १२१-अ सुभाषनगर, १७०-अ खामला, १७४-अ स्वावलंबीनगर, २०१-अ जयताळा, ३१९-अ जोगीनगर यांचा समावेश करण्यात आला आहे. नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघात साहाय्यकारी मतदान संघामध्ये १६९-अ मानेवाडा, २६२-अ दिघोरी, २६७-अ दिघोरी, २९०-अ म्हाळगीनगर, ३४४-अ मानेवाडा यांचा समावेश करण्यात आला आहे.
पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात ६७-अ पारडी, १०४-अ पुनापूर हे दोन मतदान केंद्र साहाय्यकारी आहेत तसेच पश्चिम विधानसभा मतदार संघात १९५-अ मतदान केंद्र गड्डीगोदाम हे साहाय्यकारी मंजूर करण्यात आले आहे.
उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघात १४ साहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये मतदान केंद्राच्या यादीतील क्रमांक ५-अ नारा,६-अ नारा, २७-अ नारी, ३७-अ नारी, ४०-अ नारी, ७०-अ नागसेननगर, १४६-अ नारी, १५४-अ चॉक्स कॉलनी, १५९-अ सिद्धार्थ नगर, १६१-अ सिद्धार्थ नगर, १७८-अ राणी दुर्गावतीनगर, १८४-अ यशोधरानगर, १८६-अ यशोधरानगर व २४८-अ यशोधरानगर यांचा समावेश आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघात १९ साहाय्यकारी मतदान केंद्र
रामटेक लोकसभा मतदार संघात १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर १९ साहाय्यकारी मतदान केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये सावनेर विधानसभा मतदार संघात तीन मतदान केंद्र असून यामध्ये १०९-अ गुजरखेडी, २७३-अ, चिचोरी(खापरखेडा), ३२१-अ कळमेश्वर या केंद्रांचा समावेश आहे.
हिंगणा विधानसभा मतदार संघात तीन साहाय्यकारी मतदान केंद्र असून यामध्ये ५१-अ गोधनी रेल्वे, २४१-अ वानाडोंगरी व २८०-अ इसासनी यांचा समावेश आहे. उमरेड विधानसभा मतदान संघात २२७-अ उमरेड. कामठी विधानसभा मतदार संघात १२ साहाय्यकारी मतदान केंद्र राहणार आहेत. यामध्ये ६२-अ कामठी शहर, १०८-अ कामठी शहर, १३७-अ कामठी शहर, १४०-अ कामठी शहर, ३२२-अ मारोडी, ३६४-अ पिपळा, ३६५-अ पिपळा, ३६२-अ बेसा, ३७५-अ बेलतरोडी, ३७६-अ बेलतरोडी, ३७७-अ बेलतरोडी व ४०८-अ हुडकेश्वर खुर्द या साहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश आहे.
लोकशाहीला मजबूत करा, मतदान करा- जिल्हाधिकारी
मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आणि कर्तव्यसुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकानेच मतदान जबाबदारीने करायला हवे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करा. आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडा. मतदान निर्विघ्न व निर्भय व्हावे यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. मतदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता व कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. शत:प्रतिशत मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न करावे.
अश्विन मुदगल
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी,
नागपूर