पोलीस आयुक्तांनी ड्रग विक्रेत्यांवर आणले नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:31+5:302021-06-02T04:07:31+5:30

नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ड्रगची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांना अटक करणारे पोलीस ...

Commissioner of Police brought control over drug dealers | पोलीस आयुक्तांनी ड्रग विक्रेत्यांवर आणले नियंत्रण

पोलीस आयुक्तांनी ड्रग विक्रेत्यांवर आणले नियंत्रण

googlenewsNext

नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ड्रगची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांना अटक करणारे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा सत्कार त्यांच्या कार्यालयात करण्यात आला.

चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, लॉकडाऊनचा फायदा घेऊन ड्रग विक्रेते आणि पुरवठादार शहरातील युवकांना नशेच्या आहारी ढकलत आहेत. कोणत्याही राज्यातील युवकांची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका असते. पण ड्रग विक्रेते त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करीत आहेत. उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा म्हणाले, पोलीस आयुक्तांनी ड्रग विक्रेत्यांचा भंडाफोड करून त्यांच्यावर नियंत्रण आणले आहे. त्यांचे हे कार्य प्रशंसनीय आणि सकारात्मक आहे. चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल लॉकडाऊन काळात पोलीस आयुक्तांनी शहरात कायदा व सुव्यवस्था सक्षम राखली. त्यात वाहतूक विभागाने आपली योग्यरीत्या सांभाळली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली आणि त्यामुळे संसर्ग थांबविण्यास मदत केली. चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, पोलीस विभागातर्फे गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई सुरू ठेवावी. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहील.

सत्काराप्रसंगी चेंबरचे कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव स्वप्निल अहिरकर, जनसंपर्क अधिकारी राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.

Web Title: Commissioner of Police brought control over drug dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.