खासगी रुग्णालयाच्या तक्रारींचे निराकरणासाठी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:18+5:302021-05-19T04:08:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खासजगी रुग्णालयातर्फे कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करताना निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारण्यात ...

Committee formed to resolve complaints of private hospitals | खासगी रुग्णालयाच्या तक्रारींचे निराकरणासाठी समिती गठित

खासगी रुग्णालयाच्या तक्रारींचे निराकरणासाठी समिती गठित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खासजगी रुग्णालयातर्फे कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करताना निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिकेतर्फे तज्ज्ञ लोकांची एक विशेष समिती गठित करण्यात आली आहे. समिती कोविड रुग्णांवर उपचार करताना निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारण्याची तक्रार झाल्यानंतर, तीन दिवसात बिलाची तपासणी करून आपला अभिप्राय सादर करेल. समिती गठित करण्यासंबंधी आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मंगळवारी जारी केले.

शहरातील लोकप्रतिनिधी, रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्याकडून महापौर दयाशंकर तिवारी यांना सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांना तक्रारीचे निराकरण करण्यासाठी समिती गठित करण्याची सूचना केली. आयुक्त यांनी खासगी रुग्णालयात कोविड रुग्णाचा उपचारादरम्यान होत असलेल्या अधिकच्या देयक आकारणीसंदर्भातील तक्रारीचे तातडीने निराकरण करून अनुषंगिक कार्यवाही करण्यासाठी समिती गठित केली आहे. समिती आपला अहवाल अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे सादर करेल. समिती गठित करण्याची सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली होती.

समितीमध्ये डॉ. अभिमन्यू निसवाडे (सेवानिवृत्त अधिष्ठाता) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. मिलिंद भृशुंडी, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. शेलगावकर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, सहायक लेखाधिकारी संजय वेनोरकर, संजय मटलानी, सहायक लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहसंचालक लेखा व कोषागार प्रशांत गावंडे, मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा आदींचा समावेश आहे.

सध्याच्या कोरोनाच्या या संकटामध्ये वैद्यकीय चमू अहोरात्र सेवा देत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र काही रुग्णालय याचा संधी म्हणून उपयोग घेत आहेत. जास्त दर आकारल्याने रुग्णांच्या परिवाराला होणारा त्रास रोखण्यासाठी मनपाने समिती गठित केली आहे. येणाऱ्या तक्रारीवर ७२ तासात कार्यवाही करून तक्रारीचे निराकरण केल्याची सूचना मनपा आयुक्तांना देणे व आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून तातडीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे.

....

तक्रार करण्याचे आवाहन

कोरोना उपचारात खासगी रुग्णालयामध्ये आपल्यासोबत अन्याय झालेला आहे, अशी भावना असलेल्या सर्व नागरिकांनी या समितीकडे आपली तक्रार करावी. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अंकेक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व मनपातील अधिकारी असल्याने सर्वांच्या शंकेचे निराकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

Web Title: Committee formed to resolve complaints of private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.