क्रीडा धोरणासाठी समिती नेमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:50+5:302021-07-07T04:08:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातून विविध क्रीडा प्रकारासाठी खेळाडू तयार व्हावे, या दृष्टीने खेळाडूंना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातून विविध क्रीडा प्रकारासाठी खेळाडू तयार व्हावे, या दृष्टीने खेळाडूंना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी लवकरच नागपूर महापालिकेचे क्रीडा धोरण तयार होणार आहे. याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यात शहरातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांच्या सूचनांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती सोमवारी क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांनी मनपा मुखयालयात आयोजित बैठकीत दिली.
यासाठी पाच ते सहा सदस्यांची एक समिती तयार करून प्रत्येक आठवड्यात त्यावर विचारविनिमय करण्यात येईल. क्रीडा पदाधिकाऱ्यांच्या सूचना आणि सहभागानेच क्रीडा धोरणाला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती तभाने यांनी दिली. उपसभापती लखन येरावार, सदस्य रूपाली ठाकूर, शेषराव गोतमारे, अमर बागडे, नरेंद्र वालदे, छत्रपती अवॉर्ड विजेते विजय मुनिश्वर, डॉ.शरद सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त विजय देशमुख, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर यांच्यासह क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.