धनुषला मिळतोय समाजाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:40 AM2017-11-02T01:40:58+5:302017-11-02T01:41:09+5:30
डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेल्या मुलाला दृष्टी मिळावी त्याला जग पाहता यावे यासाठी समाजाकडे ‘लोकमत’च्या माध्यमातून मदतीचा हात मागणाºया आराधनानगर......
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेल्या मुलाला दृष्टी मिळावी त्याला जग पाहता यावे यासाठी समाजाकडे ‘लोकमत’च्या माध्यमातून मदतीचा हात मागणाºया आराधनानगर येथील घोडेले कुटुंबाच्या मदतीसाठी समाजमन पुढे सरसावले आहे.
बुधवारी लोकमतने ‘अंधारलेल्या दृष्टीला हवी मदतीची ज्योत’ या मथळ्यातील वृत्तात डोळ्याच्या कर्करोगामुळे दोन्ही डोळ्यांनी अधू झालेल्या एक वर्षीय धनुष घोडेले या चिमुकल्याची व्यथा मांडली होती. मुलाच्या उपचारासाठी धनुषचे वडील प्रदीप घोडेले यांनी अलीकडेच हैदराबाद गाठले होते. तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला देत चार लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. मात्र इतकी मोठी रक्कम कशी जमवायाची हा प्रश्न त्यांच्यासमोर कायम आहे. मात्र ‘लोकमत मदतीचा हात’ या उपक्रमामुळे मुलगी जान्हवी हिच्या शस्त्रक्रियेचा खर्च झाला होता. त्यामुळे धनुषलाही लोकमतच्या माध्यमातून समाजाचा आधार मिळेल, ही अपेक्षा ठेवत प्रदीप घोडेले कुटुंबासह मंगळवारी लोकमत भवन येथे आले होते. बुधवारी धनुषला हव्या असलेल्या मदतीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर समाजातील विविध घटकातील मान्यवरांनी प्रदीप घोडेले यांच्याशी संपर्क साधला आणि मदतीचा हात पुढे केला. मुख्यमंत्री मित्र सामाजिक कार्यकर्ते डॉ.आशिष अटलोए आणि त्यांच्या सहकाºयांनी लोकमत भवन येथे बुधवारी घोडेले कुटुंबाला प्राथमिक उपचारासाठी सात हजार रुपयांची मदत केली आणि आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले.
बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलाश कुथे याप्रसंगी उपस्थित होते.
आपणही करूशकता मदत
धनुष प्रदीप घोेडेले यांना मदत करू इच्छिणाºयांनी ‘भारतीय स्टेट बँक’, शाखा खरबी चौक येथील खाते क्रमांक ३७२०२७९०९८२ व आयएफएससी क्रमांक : एसबीआयआयएन ००१८०९६ येथे धनादेश किंवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. प्रदीप घोडेले यांच्याशी ७४१४९६७५६० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.