देशातील अन्य मेट्रोच्या तुलनेत नागपूर मेट्रोने केला रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 09:25 PM2019-03-07T21:25:22+5:302019-03-07T22:29:55+5:30

देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने पहिला टप्पा कमी वेळेत पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे. नागपूर मेट्रोचा पायाभरणी समारंभ ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता, तर पहिल्या टप्प्यात खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३.५ कि़मी. नागपूर मेट्रोचे उद्घाटन ७ मार्च २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून झाले. पायाभरणी ते उद्घाटन या कालावधीसाठी साडेचार वर्षे लागली. पण प्रत्यक्ष बांधकाम वर्धा रोड विमानतळाजवळ ४ डिसेंबर २०१५ पासून सुरू झाले. तेव्हापासून साडेतीन वर्षांत महामेट्रोने १३.५ कि़मी.चे बांधकाम पूर्ण करून नागपूरकरांसाठी व्यावसायिक प्रवास सुरू केला.

Compared to the other metro cities, Nagpur Metro has recorded it | देशातील अन्य मेट्रोच्या तुलनेत नागपूर मेट्रोने केला रेकॉर्ड

देशातील अन्य मेट्रोच्या तुलनेत नागपूर मेट्रोने केला रेकॉर्ड

Next
ठळक मुद्देसाडेतीन वर्षांत व्यावसायिक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील अन्य मेट्रो रेल्वेच्या तुलनेत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने पहिला टप्पा कमी वेळेत पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे. नागपूर मेट्रोचा पायाभरणी समारंभ ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता, तर पहिल्या टप्प्यात खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३.५ कि़मी. नागपूर मेट्रोचे उद्घाटन ७ मार्च २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून झाले. पायाभरणी ते उद्घाटन या कालावधीसाठी साडेचार वर्षे लागली. पण प्रत्यक्ष बांधकाम वर्धा रोड विमानतळाजवळ ४ डिसेंबर २०१५ पासून सुरू झाले. तेव्हापासून साडेतीन वर्षांत महामेट्रोने १३.५ कि़मी.चे बांधकाम पूर्ण करून नागपूरकरांसाठी व्यावसायिक प्रवास सुरू केला.
मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी केली डॉ. बृजेश दीक्षित यांची प्रशंसा
उद्घाटनप्रसंगी गडकरी म्हणाले, डॉ. बृजेश दीक्षित हे रेल्वेशी संबंधित आहेत. मला रेल्वेचा वाईट अनुभव आहे. काम कसे होईल, यावर संशय होता. पण दीक्षित यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून १३.५ कि़मी. पहिला टप्पा पूर्ण केला आहे. त्यांच्या परिश्रमाचे हे फळ असून उद्घाटनासाठी एकत्र जमलो आहोत, असे सांगून त्यांनी दीक्षित यांची प्रशंसा केली. देशातील अन्य मेट्रोच्या तुलनेत नागपूर मेट्रोचे डिझाईन इनोव्हेटिव्ह आहे. याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री यांनी कमी वेळात कार्यान्वित झालेला नागपूर मेट्रो प्रकल्प दीक्षित यांच्यामुळे प्रत्यक्षात आल्याचे सांगून, त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.
नागपूर मेट्रो प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • २१ ऑगस्ट २०१४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ.
  • २१ मार्च २०१५ : महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाची वेबसाईट दाखल आणि लोगोचे उद्घाटन.
  • ४ डिसेंबर २०१५ : वर्धा रोड विमानतळाजवळ बांधकामाला सुरुवात.
  • १८ फेब्रुवारी २०१६ : महामेट्रो नागपूरचा पहिला स्थापना दिन.
  • १० एप्रिल २०१६ : जर्मन डेव्हलपमेंट बँक केएफडब्ल्यू आणि महामेट्रो नागपूर यांच्यात ३७५० कोटींच्या कर्जासाठी करार.
  • १६ एप्रिल २०१६ : मेट्रोचा पहिला पिल्लरचे बांधकाम पूर्ण.
  • ८ ऑगस्ट २०१६ : उत्तर-दक्षिण मार्गावर व्हायाडक्टचा पहिला गर्डर लॉन्च.
  • १२ ऑगस्ट २०१६ : खापरी मेट्रो स्टेशनचे भूमिपूजन.
  • २ सप्टेंबर २०१६ : न्यू एअरपोर्ट स्टेशनचे भूमिपूजन.
  • १७ नोव्हेंबर २०१६ : फ्रान्सच्या एफडी आणि महामेट्रो नागपूरमध्ये १३० दशलक्ष युरो कर्जासाठी करार.
  • २३ जानेवारी २०१७ : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. असे पुनर्गठन.
  • १ जून २०१७ : रशिया येथून रूळाचे आगमन.
  • २ ऑगस्ट २०१७ : तीन कोचेसच्या पहिल्या मेट्रो रेल्वेचे नागपुरात आगमन.
  • १६ जानेवारी २०१८ : सीएमआरएस चमूतर्फे प्रकल्पाची पाहणी.
  • १८ फेब्रुवारी २०१८ : महामेट्रोचा तिसरा स्थापन दिन.
  • १८ एप्रिल २०१८ : एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवासासाठी सीएमआरएसची हिरवी झेंडी.
  • २१ एप्रिल २०१८ : दिव्यांग, मुले, वरिष्ठ नागरिक व फिल्मस्टारकरिता पहिली जॉय राईड.
  • २१ मे २०१८ : जॉय राईड करणाऱ्यांची संख्या २५००.
  • २३ जून २०१८ : आमदार आणि प्रतिनिधींसाठी जॉय राईड.
  • १२ सप्टेंबर २०१८ : महामेट्रोतर्फे एअरपोर्ट साऊथ ते खापरी अ‍ॅटग्रेड सेक्शनमध्ये ऑसिलेशन ट्रायल.
  • ७ ऑक्टोबर २०१८ : जामठा कास्टिंग यार्डमध्ये अखेरचा २७३६ वा सेगमेंट तयार.
  • २८ डिसेंबर २०१८ : आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांसाठी जॉय राईड.
  • १५ जानेवारी २०१९ : चीन येथून तीन कोचेसच्या रेल्वेचे खापरी येथे आगमन.
  • ३१ जानेवारी २०१९ : महिलांसाठी नारीशक्ती कोचचे उद्घाटन.
  • ३ मार्च २०१९ : खापरी ते सीताबर्डी मार्गासाठी सीएमआरएसकडून हिरवी झेंडी.
  • ७ मार्च २०१९ : खापरी ते सीताबर्डी १३.५ कि़मी.च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन.

 

Web Title: Compared to the other metro cities, Nagpur Metro has recorded it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.